महाराष्ट्र

दसुरच्या पोलीस पाटलावर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई.

अवैध वाळू उपसा प्रकरणी कारवाई.

टीम विजयदिप न्यूज.

माळशिरस तालुक्यातील वेळापूर पोलीस ठाणे हद्दीतील दसुर येथील पोलीस पाटील अवैध वाळू धंदा करीत होता. आज सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या पोलीस पाटलाला रंगेहाथ पकडून वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.

            याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, महेश अशोक शिंदे, वय ३७, रा. दसुर (पोलीस पाटील) हा वाळूचा अवैध धंदा करीत होता. दरम्यान याबाबत आज सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दसुर परीसरात या वरती कारवाई केली असून पोलीस पाटील शिंदे सह त्याचा साथीदार मयूर ऊर्फ सोन्या मारुती चेडे, रा. खळवे यांचेवर वेळापूर पोलिसांत गुन्हा दाखल करणेत आला आहे. 

            सदर कारवाई मध्ये १२ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये २ लाख रुपयांची डम्पिंग ट्रॉली, १० लाख रुपयांचा महिंद्रा ट्रॅक्टर तर ७ हजार रुपयांची वाळू सोबत २५ हजार रुपयांची  मोटारसायकल (MH45B9719) असा मुद्देमाल आहे. 

            सदर कारवाई सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षका तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि रवींद्र मांजरे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक  खाजा मुजावर, पोहेकॉ नारायण गोरेकर, मोहन मनसावले, धनंजय गाडे, पोलीस अंमलदार धनराज गायकवाड, अक्षय दळवी, चालक समीर शेख यांच्या पथकाने केली आहे.

            सदर गुन्ह्याचा अधिक तपास वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे हे करीत आहेत.

      दरम्यान सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधिक्षका तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यात सर्वत्र अवैध धंद्यावरती कारवाईचा बडगा उचललेला असल्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले असून पोलीस अधिक्षका तेजस्वी सातपुते यांनी सुरू केलेल्या कारवाईचे सर्वसामान्य जनतेतून कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!