महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीला लवकरच मिळणार मुख्याधिकारी. – अनिकेत मानोरकर.

टीम विजयदिप न्यूज.
नव्याने स्थापन झालेल्या महाळुंग-श्रीपूर नगरपंचायतीला पुढील आठवड्यात मुख्याधिकारी मिळणार आहे. अशी माहिती जिल्हा सह.आयुक्त नगरपालिका प्रशासन अनिकेत मानोरकर यांनी दिली.
क्षेत्रफळाच्या दृष्टीने माळशिरस तालुक्यात सर्वात मोठ्या असणाऱ्या महाळूंग ग्रामपंचायतीचे नुकतेच नगरपंचायती मध्ये रूपांतर झाले असून याबाबत शासनाच्या नगरविकास विभागाने ९ मार्च रोजी अंतिम आदेश काढलेला होता. त्यानंतर महाळूंग-श्रीपूर नगरपंचाय अस्तित्वात आली व प्रशासक म्हणून माळशिरसचे तहसिलदार जगदीश निंबाळकर यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर त्यांनी महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतीला भेट देऊन पहाणी केली.

मुख्याधिकारी नेमणुकीबाबतची फाईल मा.जिल्हाधिकारी यांच्याकडे ठेवत आहोत. पुढील आठवड्यात महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतीस मुख्याधिकार्याची नेमणूक होईल.
अनिकेत मानोरकर,
जिल्हा सह.आयुक्त नगरपालिका प्रशासन.
दरम्यान महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत परिसरातील नागरिक रोज वेगवेगळ्या प्रकारचे दाखले मागण्यासाठी नगरपंचायतीच्या कार्यालयांमध्ये हेलपाटे मारत आहेत परंतु त्या ठिकाणी सही करण्यासाठी सक्षम अधिकारी नसल्यामुळे कोणतेही दाखले मिळत नाहीत.
शासनाच्या नगरविकास विभागाने महाळूंग ग्रामपंचायतीचे महाळूंग-श्रीपूर नगरपंचायती मध्ये रूपांतर झाल्याचा अंतिम आदेश काढल्यानंतर महाळूंग ग्रामपंचायत विसर्जित होऊन ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले खरे परंतु सध्या त्या ठिकाणी नगरपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी कोणीही सक्षम अधिकारी उपलब्ध नाही.
ऐन उन्हाळ्यात श्रीपूर येथील मंडई मधील असणारे आरो पाण्याचे मशीन थोडक्या खर्चासाठी बंद असल्यामुळे पाणी पुरवठा बंद. तसेच भीमा नदी कडून येणारी पाईपलाईन फुटली आहे. वीज बिले थकल्यामुळे वीज पुरवठा केव्हाही खंडित होऊ शकतो. मार्च मध्ये होणारी महसूल वसुली थांबली. अशा अनेक समस्या या ठिकाणी उपलब्ध झाल्या आहेत त्यासाठी तातडीने मुख्याधिकारी नेमणूक करण्याची गरज आहे.
महाळूंग नगरपंचायतीचा पहिल्यांदा मुख्याधिकारी होण्याचा मान कोणाला मिळणार.?
महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत मुख्याधिकारी पदी माळशिरसच्या मुख्याधिकार्यांची नेमणूक होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या या नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाच्या खुर्चीत पाहिल्यांदा बसण्याचा मान त्यांनाचा मिळण्याची शक्यता आहे.
महाळूंग-श्रीपूर नगपंचायतीला तातडीने मुख्याधिकारी नेमण्याची गरज आहे कारण नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारचे दाखले मिळेनात तसेच विकास कामांसाठी लागणारा दैनंदिन खर्च कोठून करावयाचा याचा अधिकार कोणालाही नाही. त्यामुळे विकासकामांना खीळ बसत आहे.
शरद मुंडफणे-पाटील, महाळूंग.
महाळूंग-श्रीपूर नगरपंचायतीचे बंद असलेले आरो पाण्याचे मशीन. तसेच भीमा नदी कडून येणारी पाईपलाईन त्यासंदर्भात दुरूस्ती करण्यास सांगण्यात आले आहे.
जगदीश निंबाळकर,
तहसिलदार माळशिरस तथा,
प्रशासक महाळूंग-श्रीपूर, नगरपंचायत.