धरण पाणीसाठामहाराष्ट्रशेतीविषयकसोलापूर जिल्हा

उजनीतून पाणी सोडण्यासंबंधी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार सकारात्मक…

येत्या दोन-तीन दिवसात पाणी सुटण्याची शक्यता-आ.बबनदादा शिंदे.

विजयदिप न्यूज/ मुकुंद रामदासी/ बेंबळे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेटून व सविस्तर चर्चा करून उजनी धरणातून कालवा, बोगदा, सीना-माढा व दहीगांव उपसा सिंचन योजनेद्वारे शेतीसाठी पाणी सोडण्याचा सकारात्मक निर्णय येत्या दोन-तीन दिवसात निश्चित घेतला जाईल असे ठाम आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले असल्याची माहिती आ.बबनदादा शिंदे यांनी दिली आहे.

वृत्तांत असा की, सध्या सोलापूर जिल्ह्यात सर्वत्र अवर्षणग्रस्त परिस्थिती असून उजनी धरण लाभक्षेत्रावर अवलंबून असलेल्या लाखो एकर लाभक्षेत्रातील ऊस, फळबागा, चारा वैरण अशी उभी पिके पाण्याअभावी जळून जाऊ लागली आहेत व शेतकरी प्रचंड धास्तावलेला आहे. सध्या उजनी धरणात १४ टक्के उपयुक्त पाणी असून ७.२२ टीएमसी पाणीसाठा तयार झालेला आहे.

आगामी दोन ते अडीच महिण्याच्या पावसाळ्यात धरणात आणखीन ज्यादा पाणी येईल तेव्हा येईल परंतु सोलापूर जिल्ह्यासाठी कालवा, भीमा-सीना जोड कालवा (बोगदा), सीना-माढा व दहिगांव उपसा सिंचन योजना याद्वारे तातडीने पाणी सोडून उभ्या पिकांना जीवदान मिळावे म्हणून आ.बबनदादा शिंदे आ.संजयमामा शिंदे, आ.यशवंत माने, माजी आ.राजन पाटील, कल्याणराव काळे आदी मान्यवरांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मुंबईमध्ये भेट घेऊन त्यांना जिल्ह्यातील शेती पिकांच्या भीषण वस्तुस्थिती विषयी निवेदन दिले व उजनीतून कालवा, बोगदा, सिना-माढा व दहीगांव सिंचन योजनेतून तातडीने पाणी सोडून लाखो एकरातील पाण्याअभावी जळून चाललेल्या उभ्या पिकांना जीवदान मिळवून द्यावे अशी आग्रही मागणी केली व पाणी सोडावेच लागेल म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना साकडे घातले, याप्रसंगी सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील उपस्थित होते.

पाण्यासाठीच्या रास्त मागणी विषयी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले की, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करून येत्या दोन-तीन दिवसात उजनीतून पाणी सोडण्याविषयी सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन आ.बबनदादा शिंदे यांचे सहित इतर सर्व निवेदनकरत्यांना दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!