सोलापूर जिल्हा

सर्वसामान्यांच्या कामासाठी तळमळीने प्रयत्न करा. – अतुल खुपसे-पाटील.

जनशक्ती संघटनेची पदाधिकारी कार्यशाळा संपन्न.

टिम: विजयदिप न्यूज.

२०१९ च्या विधानसभा निवडणुकी नंतर राज्यातील सर्व पक्षांमध्ये अस्थिरता दिसून येत आहे. सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. म्हणून सर्वसामान्यांच्या कामासाठी तळमळीने प्रयत्न करा असे आवाहन जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे-पाटील यांनी केले आहे.

भीमानगर (ता. माढा) येथे जनशक्ती संघटनेची कार्यशाळा पार पडली.यावेळी कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी वर्षभर केलेल्या कामाचा आढावा संघटनेसमोर मांडला. आजतागायत त्यांना आलेल्या अडचणीचे समाधान केलं आणि मार्गदर्शन केलं. खेळीमेळीच्या वातावरणात कार्यशाळा पार पडली.

जनशक्ती शेतकरी संघटनेच्या पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यशाळेत संस्थापक अध्यक्ष अतुल  खुपसे यांच्या अध्यक्षतेखाली काही पद नियुकत्या देण्यात आल्या. यामधे किशोर गोरक्ष साबळे यांची अहमदनगर जिल्हाध्यक्ष, रविंद्र सुरेश लचके यांची राहता तालुकाध्यक्ष व सुदाम बाळासाहेब पानसरे यांची संगमनेर तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली व संबंधित पदांचा कार्यभार सोपविण्यात आला.

जनशक्ती शेतकरी संघटना गेल्या 8 वर्षापासून गोरगरीब, वंचित व गरजवंतांची विविध उपक्रमाव्दारे सेवा करत आहे. प्रदेशाध्यक्ष अतुल खुपसे-पाटील २० वर्षापासून सामाजिक कार्यात सर्व महाराष्ट्रात परिचित आहेत आणि हाच ध्यास घेऊन असंख्य कार्यकर्ते संघटनेकडे येत आहेत.

यावेळी शर्मिला नलावडे, गणेश वायभासे, विठ्ठल मस्के, मनीषा दांडेकर, राहुल चव्हाण, राणा वाघमारे, किशोर शिंदे, किशोर साबळे, रवींद्र लचके, सुदाम पानसरे, पद्माताई पाखरे, विजय वाघ, औदुंबर सावंत, दिलीप लोंढे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!