सोलापूर जिल्हा

सिंहगड पब्लिक स्कूल, कोर्टी पंढरपूर शाळेचा मुलींच्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक.

समृद्धी घाडगे मँन ऑफ दि मँच पुरस्काराने सन्मानित.

टिम: विजयदिप न्यूज.

कोर्टी पंढरपूर येथील सिंहगड पब्लिक स्कूल, या शाळेतील मुलींनी जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत  दमदार कामगिरी करत १७ वर्ष वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला.

रविवार दि.०८ ऑक्टोबर रोजी जिल्हा क्रिडा कार्यालय अंतर्गत शंकरनगर, अकलूज येथील शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश स्कूल येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेत १७ वर्ष वयोगटतील मुलींनी प्रथम क्रमांक पटकावला व विभागीय सर्धेसाठी निवड झाली. तसेच सलग दोन वर्ष विभागीय सर्धेसाठी निवड होण्याचा मान मिळविला.

संघाची कर्णधार श्रुती बाबर, स्नेहा शिंदे, तनिष्का जवेरी, समृद्धी घाडगे यांनी अष्टपैलू कामगिरी केली. तसेच मँन ऑफ दि मँच पुरस्काराने समृद्धी घाडगे ला सन्मानीत करण्यात आले.

जिल्हास्तरीय स्पर्धेत मुलींच्या या दमदार कामगीरीबद्दल संस्थेचे संस्थापक एम.एन नवले, कॅम्पस डायरेक्टर कैलास करांडे, शाळेच्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिता नायर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलींचे कौतुक केले व विभागीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेसाठी मुलींना क्रिडा शिक्षक स्वाती म्यागेरी, कुलदीप कोरडे, मल्हारी एकतपुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!