महाराष्ट्रसोलापूर जिल्हा

‘कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी’च्या ५,०५,५५५ व्या साखर पोत्याचे पूजन.

विजयदिप न्यूज:

श्रीपूर (ता.माळशिरस) येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये उत्पादित झालेल्या ५ लाख ५ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते संपन्न झाले.

यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन कैलास खुळे, संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, सिताराम शिंदे, राणू पाटील, तज्ञ संचालक दाजी पाटील, दिलीप गुरव कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

यावेळी कारखान्याचे चेअरमन मा.आ.प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, कारखान्याचा २०२३-२४ चा गळीत हंगाम हा सुरळीत सुरु असून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत आला आहे. गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसास चांगला दर देत असून कारखान्याच्या व्यवस्थापनाने चालू गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये विस्तारीकरण केलेमुऴे प्रतीदिन ८ हजार मे.टनापर्यंत ऊस गाळप करीत आहे. शासनाने सिरप पासून इथेनॉल निर्मितीवर बंदी आणलेमुळे कारखान्याचे सुमारे १ हजार २०० ते १ हजार ५०० मे.टन ऊस गाळप कमी होत आहे. तरीही कारखान्याने सभासदांचे नुकसान होवू नये म्हणून इतर कारखान्यास ऊस देणेचे धोरण निश्चित केले आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांचा ऊस वेळेवर गाळप करणार आहोत. या हंगामात कारखान्याचे १० लाख मे.टन ऊस गाळपाचे उदीष्ट होते परंतू उदीष्टापेक्षाही जास्तीचे गाळप कारखाना करणार आहे. कारखान्याचा को-जन प्रकल्प, आसवनी प्रकल्प वाढीव क्षमतेने चालत आहेत.

यावेळी बोलताना कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कारखान्याच्या ऊस उत्पादकांनी ऊसाची लागवड मोठ्या प्रमाणात जुन व जुलै मध्ये केलेमुळे सुमारे ५.५० लाख मे.टन ऊस या महिन्यातील होता. त्यामुळे ऊस उत्पादकांचा ऊसतोडी वेळेवर करणे व ऊस उत्पादकांची ऊस तोडणीसाठीची गैरसोय होणार नाही याची काळजी व्यवस्थापन घेत आहे. अवकाळी पावसामुळे ऊसाच्या उत्पादनात १० टक्के पर्यंत वाढ झालेमुळे ऊस उत्पादकांच्या ऊसाचे टनेजमध्ये वाढ झाली आहे. या हंगामात कारखान्याने ६९ दिवसात ५ लाख ३३५ मे.टन ऊसाचे गाळप करुन सरासरी १०.९४ टक्के साखर उताऱ्याने ५ लाख ५ हजार ५५५ क्विं. पोती साखर उत्पादन केले आहे. अद्यापही कारखान्याकडे सुमारे ७.५० लाख मे.टन ऊस गाळपासाठी शिल्लक आहे. को-जनरेशन मधून २.८४ कोटी युनिट विज निर्मीती केली असून आसवनी प्रकल्पामधून ४० लाख बल्क लि.उत्पादन घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!