इतर

पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभार्थ्यांनी लाभ घेऊन आर्थिक उन्नती करावी.- धैर्यशील मोहिते-पाटील

टिम विजयदिप न्यूज.

केंद्र सरकारच्या पंतप्रधान स्वनिधी योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेऊन स्वतःची आर्थिक उन्नती करावी असे आव्हान भाजपचे जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केले. या योजनेच्या प्रचार आणि प्रसारा संदर्भात श्रीपुर येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात धैर्यशील मोहिते-पाटील बोलत होते.

जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या छोट्या व्यवसायकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ही योजना देशभरात राबवली जात आहे. आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी भाजपचे सर्व पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. श्रीपुर व पूर्व परिसरात या योजनेसाठी पात्र लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. या हेतूने येथे या शिबिराचे आयोजन केल्याचे ही धैर्याशिल मोहिते-पाटील यांनी सांगितले. गावातील एकही पात्र लाभार्थी यापासून वंचित राहता कामा नये यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना देखील धैर्यशील मोहिते-पाटील यांनी दिल्या. यावेळी महाराष्ट्र बँक व इंडियन ओव्हरसिस बँक यांच्या अधिकाऱ्यांनी देखील मार्गदर्शन करत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्य करण्याची ग्वाही दिली.

कार्यक्रमास ज्येष्ठ नेते रामचंद्र सावंत-पाटील, महाळुंग-श्रीपुर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष लक्ष्मी चव्हाण, उपनगराध्यक्ष तथा गटनेते भीमराव रेडे-पाटील, सरकार महर्षी कारखान्याचे संचालक नानासाहेब मुंडफणे, भाजपच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष कल्पना कुलकर्णी, नगरसेवक रतनसिंह रजपूत, तानाजी भगत, सोमनाथ मुंडफणे, डॉ.संजय लाटे, नाझिया पठाण, प्रकाश नवगिरे यांच्यासह डॉ.हरिश्चंद्र सावंत-पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य अरुण तोडकर, अल्लाबक्ष शेख, सुहास गाडे, संग्रामसिंह राजपूत भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जे व्यावसायिक आठवडे बाजार अथवा रस्त्याच्या कडेला तात्पुरती दुकाने टाकून अतिक्रमणात व्यवसाय करतात असे सर्व लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत. त्यांना सुरुवातीला दहा हजार रुपये कर्ज मिळेल ते फेडल्यानंतर वीस हजार त्यानंतर पन्नास हजार असे कर्ज टप्प्याटप्प्याने दिले जाणार आहे. या कर्जाचे सर्व व्याज केंद्र सरकार अदा करणार आहे. यासाठी कसल्याही जाचक अटी अथवा जामीनदारांची गरज नाही. या प्रकारे कर्ज घेऊन या लाभार्थ्यांमध्ये आर्थिक सुबत्ता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना अमलात आणली असल्याचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!