महाराष्ट्रमाळशिरस तालुका

प्रशांत सरूडकर सहकार महर्षी जीवनगौरवचे मानकरी

स्व.वसंतराव मगर स्मृतिप्रित्यर्थ शिक्षक विद्यार्थी पुरस्कार संपन्न

विजयदिप न्यूज.

माळशिरस तालुका प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडी आणि समविचारी शिक्षक परिवाराकडून दरवर्षी दिला जाणारा सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील जीवनगौरव पुरस्कार इतिहास तज्ञ बालभारती पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळाचे सदस्य उत्तम व्याख्याते आणि केंद्रप्रमुख प्रशांत सुरडकर यांना प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना संवेदनशील पुरस्कार, उत्कृष्ट शाळा पुरस्कार, विद्यार्थ्यांसाठी प्रतिभागौरव पुरस्कार, क्रीडा शाळा पुरस्कार, कलाविष्कार शाळा पुरस्कार आदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शिक्षक नेते कै.वसंतराव मगर गुरुजी यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी तालुका शिक्षक संघाच्यावतीने शिक्षक सन्मान पुरस्कार वितरित होतात.

कार्यक्रमाचे उद्घाटक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते सरूडकर यांना सपत्नीक सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी सभापती शोभाताई साठे, उपसभापती प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य मंगलताई वाघमोडे, राज्य सरचिटणीस आबासाहेब जगताप, कार्याध्यक्ष पोपटराव सूर्यवंशी, कार्यकारी अध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे, नपा-मनपा सरचिटणीस संजय चेळेकर, सल्लागार लहू कांबळे, मार्गदर्शक तात्यासाहेब यादव, अशोक मगर, हनुमंत पवार, विठ्ठल नष्टे, श्रीमंत गुंड, रणजीत थिटे, दिलीप ताटे, जय विजय परिवाराचे सुभाष मिसाळ, एकल शिक्षक मंच जिल्हाध्यक्ष इकबाल नदाफ, शिक्षक समितीचे शरद रुपनवर, जुनी पेन्शनचे किरण काळे उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी मगर गुरुजींच्या कार्याला उजाळा देणाऱ्या शिक्षक संघाच्या शिक्षक-शाळा कौतुक सोहळ्याचे कौतुक केले. जीवन गौरव प्राप्त प्रशांत सरूडकर यांनी सन्मान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी महिला शिक्षक संघाच्या वतीने आणि चंदुकाका अँड सराफ यांनी प्रायोजित केलेल्या महिला स्नेह मेळावा आणि तिळगुळ वाटप कार्यक्रमाचेही आयोजन केले गेले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाची तालुका कार्यकारणी, राजेंद्र वायसे, हनुमंत खताळ, शहाजी काशीद, राजेंद्र जाधव, राजकुमार ठोंबरे, भारत मगर, राजेंद्र उकिरडे, राम काटकर, विनोद थोरात, राजेंद्र मिसाळ, संग्राम दळवी, उमाजी माने, सचिन बरडकर, रमेश सरक, विजय भोसले, राजकुमार भोसले, राजू गोरवे, पांडुरंग मोहिते, सुरेश कुंभार, संतोष पवार, बाळासाहेब शिंदे, दगडू पवार, लालासाहेब गायकवाड, पोपट पालवे, अण्णा मगर, अर्जुन पिसे, दत्ता कांबळे, ज्ञानेश्वर मिसाळ यांनी योगदान दिले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक तालुकाध्यक्ष विजय शिंदे, आभार सरचिटणीस मनोहर एकतपुरे, सूत्रसंचालन राजाराम गुजर, सुहास उरवणे यांनी केले.

महिला कार्यकारणी तर्फे महिला स्नेह मेळावा:

चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायोजित महिला स्नेह मेळाव्यानिमित्त हळदी कुंकू, तिळगुळ चिक्की आणि हमखास भेटवस्तू देण्यात आल्या. महिला कार्यकारिणीने पाच महिलांना लकी ड्रॉ मधून बक्षीस ठेवली होती. महिलांना हा उपक्रम चांगलाच भावला.

शिक्षक संघ हा आमचा परिवार आहे. आमच्या परिवारात बाकीच्यांनी डोकावू नये. राज्य व जिल्हा शिक्षक संघ तालुका संघाच्या पाठीशी उभे आहेत.

मच्छिंद्रनाथ मोरे,

अध्यक्ष-जिल्हा शिक्षक पतसंस्था

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!