देश-विदेश

हवेतून ऑक्सिजन निर्मितीचा ‘पांडुरंग कारखान्या’ने उभारला राज्यातील सहकारी साखर कारखानदारीतला पहिला पथदर्शी प्रकल्प.

टीम विजयदीप न्यूज.

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर (ता.माळशिरस) या साखर कारखान्याने सहकारी साखर कारखानदारीमध्ये महाराष्ट्रातील स्किड माऊंटींग पध्दतीचा प्रेशर स्विंग ऍडसॉर्ब्शन हवेतून ऑक्सीजन निर्माण करणारा पहिला पथदर्शी प्रकल्प उभारला असून या प्रकल्पाचे ‘सुपंत ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प’ असे नामकरण करण्यात आले तसेच प्रकल्पातील ऑक्सीजन ज्युबीलंट फार्मा अँड केमीकल कं,  मुंबई यांच्याकडून प्रथ:करण करुन घेणेत आला असून निर्माण झालेला ऑक्सीजन मेडिकल उपयोगासाठी योग्य असल्याचा दाखला प्राप्त झाला आहे. प्रकल्पाचे उद्घाटन व कोनशिला अनावरण कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.

कोरोना संसर्गाने देशात व राज्यात थैमान घातलेले आहे या कोरोनाच्या  दुसर्‍या लाटेमध्ये असंख्य कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सीजन अभावी प्राण गमवावे लागत आहेत. तसेच देशात व राज्यात सर्वत्र ऑक्सीजन कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे ही बाब चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक तसेच व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर सर्वप्रथम या प्लॅंटची उभारणी करण्याची तयारी दर्शवून चांगल्या प्रकारचा दिर्घकाळ चालणारा इम्पोर्टेड प्लांट  बसविण्याचे धोरण निश्चित करण्यात आले. त्यानुसार साई नॉन कन्वेर्शियल एजन्सी, नाशिक यांच्यामार्फत तैवान या देशातून ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आयात करण्याचे ठरले तसेच लवकरात-लवकर प्रकल्प उभारणी करिता जहाजा ऐवजी विमानातून हा प्रकल्प आणण्यात आला. सदर प्रकल्पास अनुषंगिक असणारी सर्व कामे अगोदरच तयार करुन ठेवल्याने फक्त आठ तासात या प्रकल्पाची कारखाना कार्यस्थळी उभारणी करणे शक्य झाले.

प्रकल्पाची क्षमता २५ क्युबिक मीटर प्रति तास.

हा प्रकल्प महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखानदारी मधील स्किड माऊंटींग पध्दतीचा प्रेशर स्विंग ऍडसॉर्ब्शन हवेतून ऑक्सीजन निर्माण करणारा पहिलाच पथदर्शी प्रकल्प आहे. सर्वसाधारण हवेमध्ये ७८% नायट्रोजन, २१% ऑक्सीजन व १% इतर वायू असतात अशीही नैसर्गिक हवा या प्रकल्पांमध्ये खेचून घेतली जाते व पी.एस.ए. टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून या हवेमधून नायट्रोजन व इतर वायू, आद्रता धुलिकण इत्यादी अनावश्यक बाबी वेगळया केल्या जातात यामध्ये मुख्यत्वे करुन कॉम्प्रेसर प्युरिफायर, बूस्टर पंप, प्रोग्राम लॉजिक कंट्रोल सिस्टीम, फिलिंग स्टेशन इत्यादी मशिनरी येत असते. या प्रकल्पातून वेगळा करण्यात आलेला ऑक्सीजन ९३% ते ९६% इतकी शुध्दता असणारा निर्माण होतो हा ऑक्सीजन एका स्टील टँक मध्ये साठविला जात असून तो नंतर बुस्टर पंपाद्वारे ऑक्सीजन सिलेंडरमध्ये भरला जातो कारखान्याकडील हा प्रकल्प विदेशी असल्यामुळे पूर्णपणे स्वयंचलित आहे या प्रकल्पाची क्षमता २५ क्युबिक मीटर प्रति तास म्हणजेच प्रतिदिन सुमारे १०० जम्बो सिलेंडर भरणे इतका ऑक्सीजन तयार करणारा आहेत.

प्रकल्पाचे स्वतंत्रपूर्ण व सातत्यपूर्ण उत्पादन सुरु राहणार.

ऑक्सीजन प्लॅन्टमधून उत्पादित होणारा सर्व ऑक्सीजन आवश्यक त्या मेडिकल उपयोगाकरिता देण्यात येणार आहे. हा प्रकल्प स्वतंत्र स्वरुपाचा असल्यामुळे त्यासाठी कारखान्याकडील सध्या चालू असलेला कोणताही  प्रकल्प बंद ठेवावा लागणार नाही, त्यामुळे या प्रकल्पाचे स्वतंत्रपूर्ण व सातत्यपूर्ण उत्पादन सुरु राहील, प्रकल्प उभा करताना व्यवस्थापनाने अभ्यासपूर्ण निर्णय घेतल्यामुळे जास्तीची प्रकल्प उभारणीसाठी ५५ ते ६० लाख रुपये खर्च आला आहे.

“कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या मधल्या काळात दररोज १७०० ते १७५० टन ऑक्सीजनची गरज होती. त्या प्रमाणात आपल्याकडे निर्मिती होत नव्हती आदरणीय शरदचंद्रजी पवार व आदरणीय नितीन गडकरी यासारख्या नेत्यांनी सुध्दा ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पासंदर्भात अनेक संस्था व कारखान्यांना आवाहन केले होते. महाराष्ट्राच्या जडण-घडणीमध्ये साखर उद्योगाचे खूप मोठे योगदान आहे. महाराष्ट्र व देश ज्या-ज्या वेळेस संकटात सापडला त्यावेळेस साखर उद्योगाने प्रथम जनतेला मदतीचा हात देण्याची भूमिका घेतली“.

आ.प्रशांतरव परिचारक,

चेअरमन,

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपूर. 

कारखान्याचे सभासद, शेतकरी व हितचिंतक यांना कोरोना पार्श्वभूमीमुळे या समारंभास उपस्थित राहता येणार नसल्याने यु-टयुब द्वारे सदरचा कार्यक्रम पहाता यावा यासाठी यु-टयुब लिंक देवून तशी व्यवस्था करण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!