सोलापूर जिल्हा

श्रीपूरच्या श्री.सेवा हाँस्पिटलला आगाशे यांच्याकडून आँक्सिजन काँन्सनट्रेटर मशीन भेट.

टीम विजयदिप न्यूज.

श्रीपुर (ता.माळशिरस) चे नंदनवन करणारे आगाशे कुंटुंबाच्यावतीने अशुतोष आगाशे यांनी श्रीपुर येथील डाँ.सुहास बनसोडे यांच्या श्री.सेवा हाँस्पिटलला आँक्सिजन काँन्सनट्रेटर मशीन स्वखर्चाने भेट देऊन श्रीपुरकरांशी असलेले नाते जपले आहे.

कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेमुळे भारतात कोरोना रुग्णाचे प्रमाण मोठया प्रमाणावरती वाढले असून आँक्सिजन न मिळाल्याने अनेक रुग्णांना आपले जिव गमवावे लागले आहेत व गमावत आहेत. कोरोना या जागतिक महामारीमुळे संपुर्ण जगावरती मोठ संकट निर्माण झाले आहे.

अशा संकटात अशुतोष आगाशे यांनी दिलेल्या आँक्सिजन काँन्सनट्रेटर मशीनमुळे व त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे अनेक पेशंटना आँक्सिजन मिळणार आहे. त्यामुळे अनेकांचे प्राण वाचणार आहेत. त्यांचा सहकार्यामुळे श्रीपूर परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच आँक्सिजन काँन्सनट्रेटर मशीन दिल्याबद्धल डॉ. सुहास बनसोडे यांनी आगाशे कुंटुंबाचे आभार मानले आहेत. वाचण्यास मदत होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!