श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या ११ लाख ९१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन.

टिम: विजयदिप न्यूज.
श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये उत्पादित झालेल्या ११ लाख ९१ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक, संचालक सुदाम मोरे आणि हणमंत कदम यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदि उपस्थीत होते.
यावेळी कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ हा २३ ऑक्टोबर २०२१ रोजी सुरु झाला असून कारखान्याने १५८ दिवसात १० लाख ४७ हजार ३७ मे.टन ऊसाचे गाळप करुन ११ लाख ९१ हजार १११ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्याच बरोबर कारखान्याचा साखर उताराही ११.४० असून यामध्ये बी हेवी धरुन आणखी साखर उताऱ्यामध्ये वाढ होणार आहे. श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना हा नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत आला आहे. स्व.सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच कारखान्याचे कामकाज सुरु असून त्याचप्रमाणे पुढेही अखंडीतपणे सुरु राहील अशी ग्वाही दिली. कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये प्रतिदिन सरासरी ७ हजार मे.टनाने गाळप चालत असून त्यामध्ये सातत्य राखले आहे. त्याचबरोबर साखर कारखान्याचा साखर उताराही चांगला आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये १ एप्रिल २०२२ नंतर गाळपास येणाऱ्या ऊसास प्रति मे.टन रु.१००/- प्रमाणे एफ.आर.पी. व्यतीरिक्त आगाऊ रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे एप्रिल २०२२ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसास प्रती मे. टन रूपये २ हजार ७०० प्रमाणे ऊस दर दिला जाईल. कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखाना गाळपामधील आज पर्यंतचे सर्व रेकॉर्ड तोडुन उच्चांकी गाळप करणार आहे.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीप चव्हाण, हरीष गायकवाड, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, राणू पाटील कारखान्याचे वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील, प्रोडाक्शन मॅनेजर एम.आर. कुलकर्णी, केन मॅनेजर एस.सी.कुमठेकर,चिफ अकौंटंट आर.एम.काकडे,डिस्टीलरी मॅनेजर एस.ई.शेख, को.जन मॅनेजर सचिन विभुते, सिव्हील इंजिनिअर एच.एस.नागणे, मटेरियल मॅनेजर एम.जी.देशपांडे, संगणक प्रमुख, तानाजी भोसले, ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर,सहा.अधिक्षक बी.एस.बाबर आदि उपस्थित होते.