महाराष्ट्र

अकलूज पोलीसांची भूमिका आदर्श घेण्यासारखी.

पोलीसांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे जमीन खरेदीचा व मालकी हक्काचा वाद मिटला. 

टीम विजयदिप न्यूज.

अकलूज पोलीसांची भूमिका आदर्श घेण्यासारखी असून पोलीसांच्या सकारात्मक दृष्टीकोनामुळे जमीन खरेदीचा व मालकी हक्काचा वाद मिटण्यास मदत झालेली असून पोलिसांच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अकलूज पोलीस स्टेशन हद्दीतील संग्रामनगर (रिसवडकर यांचे प्लॉट १०१/प्लॉट नंबर ९) येथील ३ गुंठे जागा भैय्या उर्फ मोहन तिकोटे, रा.शिवतेजनगर यांनी सन २००९ मध्ये त्यांचे मालकीची असलेली रीतसर जागा  रजिस्ट्री करून  खरेदी केली होती व ताबा घेवून बांधकाम केले होते. परंतू ३१ डिसेंबर २०२० रोजी तीच जागा टीव्हीएस मोटारसायकल शोरूमचे मालकाचा मुलगा असिफ मोहंमद शाह मकानदार यांनी रिसवडकर यांचेकडून खरेदी केल्याचे समजले होते. त्यानंतर सुमारे आठ ते दहा महीन्या पासून दोन्ही बाजू मालकी हक्कावरून तणावात होत्या. याबाबत मूळमालक मोहन तिकोटे यांनी पोलीस स्टेशनला रीतसर अर्ज दिला होता.

याबाबत पोलीस निरीक्षक अरूण सूगावकर यांचे मार्गदर्शनाखाली व आदेशाने चौकशी करण्यात आली व दोन्ही पार्टीशी चर्चा घडवून सत्यता पडताळणी केली. दरम्यान मोहन तिकोटे यांनी माळशिरस न्यायालयात जाण्याची तयारी करून वकीलाशी बोलणी केली होती. परंतू पोलीस हवालदार रमेश सूरवसे-पाटील यांनी दोन्ही बाजूंना एकत्रीत आणून कोर्टाचा वेळ महत्वाचा असून मिळणारा न्याय उशीरा व विलंबाने मिळेल याची माहीती सांगून मोहन तिकोटे हेच पहीले खरेदीदार मालक आहेत. त्यांना विनाअट विनाविलंब मालकी हक्क दयावा ही भूमिका मांडली असता मोहंमद मकानदार यांनीही आपले मोठया भावांशी चर्चा केली व पोलीसांना स्वखूषीने जबाब देवून रजीस्ट्री कार्यालयात बिनाकब्जा साठेखत रदद करून लेखी कायदेशीर संमती देण्याची तयारी दाखवली.

पोलीसांकडून पोलीस स्टेशनमध्येच दिवाणी दावा मिटवण्याची तसेच तक्रारदार व आरोपी या दोघांचाही सत्कार करण्याची बहूदा ही पहीलीच वेळ असेल.

हीच खरी माणूसकी व हीच खरी समजदारी…

ज्या मालकी हक्कासाठी आज अनेक लोक कोर्टात दावे टाकून वर्षानूवर्ष लढत आहेत. त्यांनी हे उदाहरण नक्की घ्यावं. आज मकानदार यांनी घेतलेली समजदारी फार मोलाची असून न्यायालयाचा ४-५ वर्षाचा वेळ आणि ताण वाचवला हे नक्कीच. यासाठीच दोघांचेही पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अरूण सूगावकर यांचे हस्ते हार घालून स्वागत केले आहे. यावेळी पोलीस हवालदार रमेश सूरवसे-पाटील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!