वेळापूर विकास सोसायटीने राज्यात आदर्श निर्माण केला – माधवराव माने-देशमुख.

टीम: विजयदिप न्यूज.
कोरोना महामारीच्या काळात संस्था अडचणीत असतानाही लाभांश वाटप करुन वेळापूर विकास सोसायटीने राज्यात आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीचे माजी सदस्य माधवराव माने-देशमुख यांनी केले. ते वेळापूर विकास सेवा सोसायटीच्या वतीने लाभांश वाटप समारंभ आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी ते बोलत होते.

प्रारंभी संस्थेचे चेअरमन अमरसिंह माने-देशमुख यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेवून संस्थेने राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली १३ वर्षे १५ टक्के लाभांश वाटप केला आहे . यामध्ये सभासदांचा मोठा सहभाग आहे. संस्थेला अहवाल सालात २० लाख नफा झाला आहे. संस्थेचे १ हजार २५० सभासद असून राखीव निधी १ कोटी ६५ लाख, बॅंक शेअर्स ३० लाख ५० हजार, मुदत ठेव २५ लाख व कर्ज वाटप ४ कोटी आहे.
शासनाने कर्ज माफी जाहिर केली. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आला. नियमित कर्ज परतफेड करणार्या सभासदांना प्रोत्साहनपर ५० हजार देण्याचे महाविकास आघाडी सरकारने जाहीर केले त्याचे काय झाले व ते त्वरीत द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
अमरसिंह माने-देशमुख.
लाभांश वाटप सहकार महर्षी साखर कारखान्याचे संचालक शंकरराव माने-देशमुख, पांडूरंगराव माने-देशमुख, माधवराव माने-देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संचालक आनंदराव माने-देशमुख, बाळासाहेब माने- देशमुख, बाळासाहेब घाडगे, शहाजी कदम, शिवाजी सावंत, चंद्रकांत क्षिरसागर, ज्ञानेश्वर आडत, शंकरराव आडत, अर्जून भाकरे, हरिभाऊ माने- देशमुख, ओंकार माने- देशमुख, दत्तात्रय माने, पांडुरंग माने- देशमुख, दत्तात्रय बनकर, वीरकुमार दोशी, रंगनाथ माने, मोहन पालकर, दशरथ मंडले, नवनाथ इंगळे, अनंत माने- देशमुख, लक्ष्मण सावंत, सतीश नवले, पांडुरंग खराडे, लक्ष्मण केंगार, अजिनाथ अडसूळ, माणिक मदडे, विनायक इंगळे, संभाजी माने-देशमुख, नंदकुमार मांडवे, गिरीश कुलकर्णी, चंद्रकांत पिसे, नंदकुमार पाटील, संस्थेचे सचिव भागवत मिले, क्लार्क शिवाजी सावंत, शिपाई संजय करमाळकर, सह सभासद आणि शेतकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमचे प्रास्ताविक व आभार व्हा.चेअरमन महादेव भाऊ ताटे यांनी केले.