शेतीविषयक

बाळासाहेब निकम यांचा सेवानिवृत्ती बद्दल सत्कार समारंभ

टिम: विजयदिप न्यूज.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना, गंगामाई नगर कारखान्याचे माळशिरस गटाचे श्रीपुर (ता.माळशिरस) येथील अ‍ॅग्री ओव्हरसियर बाळासो निकम यांचा सेवानिवृत्त झाल्याबद्दल सत्कार माळशिरस गटाचे नुतून अ‍ॅग्री ओव्हरसियर प्रदिप राजमाने यांच्या हस्ते करण्यात आला.

बाळासाहेब निकम यांनी १९८९ ते २००९ पर्यत पांडुरंग सहकारी साखर कारखाना, श्रीपुर शेती विभागात काम केले होते. त्यानंतर २००९ ते ३१ मे २०२२ पर्यंत विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना. लि गंगामाईनगर या कारखान्यामध्ये माळशिरस गटामध्ये अ‍ॅग्री ओव्हरसियर म्हणून काम केले.

सेवानिवृत्त झाल्याबद्धल त्यांचा सत्कार समारंभ घेण्यात आला यावेळी अनेक सभासद शेतकऱ्यांनी उपस्थित राहून त्यांचा सत्कार करून पुढील आयुष्य निरोगी, सुख-समृद्धि जावे अशा शुभेच्छां दिल्या.

यावेळी माळशिरस गटाचे नुतून अ‍ॅग्री ओव्हरसियर प्रदीप राजमाने, चंद्रकांत सावंत, निशांत शेळके, बबन नवगिरे, अतुल कचरे, चैतन्य चव्हाण, विकास खटके, वैभव शेळके, नितीन शेळके, हर्षवर्धन शेळके, अमर भाग्यवंत, दत्तात्रय कोळी, आनंद दधांडे यांच्या सह महाळुंग-श्रीपुर परिसरातील गावातील शेतकरी सभासद  मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!