शेतीविषयकसोलापूर जिल्हा
विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यामार्फत दिपावलीनिमित्त घरपोच साखर वाटप.

टीम विजयदिप न्यूज.
विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्यामार्फत दिपावली निमित्त कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकर्यांना कारखान्याचे चेअरमन आ.बबनदादा शिंदे व जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गर्दर्शनाखाली घरपोच साखर वाटप करण्यात येत आहे.

माळशिरस तालुक्यातील खळवे, माळखांबी, विठ्ठलवाडी, जांबुड याठिकाणी साखर वाटप करण्यात आली.
माळखांबी येथे साखर वाटप करताना ऊस उत्पादक शेतकरी रामचंद्र भांगे, माढा विधानसभा उपाध्यक्ष मनुदादा शेळके-पाटील, महादेव गमे-पाटील, महादेव कोडग, वसुदेव शेळके-पाटील, माऊली शेळके, चंद्रकांत शेळके-पाटील, दादासो गमे, सागर चव्हाण, राहुल चव्हाण, तसेच कारखाना कर्मचारी नवगिरे, वैभव शेळके, निशांत शेळके, चैतन्य चव्हाण आदि उपस्थित होते.