महाराष्ट्र

आ.रोहितदादा पवार यांचा गुरुवारी सोलापूर, उस्मानाबाद, अरण व पंढरपूर दौरा.

टीम विजयदिप न्यूज.

      कर्जत-जामखेड मतदार संघाचे आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवा नेते आ.रोहितदादा पवार हे उदया गुरवार दि.२१ जानेवारी रोजी सोलापूर, उस्मानाबाद दौर्‍यावरती येणार आहेत. याचबरोबर ते अरण व पंढरपूर येथे सुध्दा येणार आहेत.

सोलापूर शहरासह ते उस्मानाबाद, अरण व पंढरपूर दौरा करणार असून त्यांचा सविस्तर दौरा खालील प्रमाणे आहे.

      या दौर्‍यामध्ये आ.रोहितदादा पवार हे स. ८ वा. सोलापूर येथील हॉटेल रोहित या हॉटेलला सदिच्छा भेट देणार आहेत. त्यानंतर ते स. ८.४५ वा. सोलापूर येथील श्री.सिध्देश्र्वर मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत, स. ९.१५ वा ते महाराष्ट्र पत्रकार संघ कार्यालयास भेट देणार आहेत. स. १०.०० वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठास भेट,  दु. १२.३० वा. छत्रपती शिवाजी हायस्कुल, उस्मानाबाद येथे भाई उद्धवराव पाटील यांच्या १०१ व्या जयंती निमित्त कोविड योध्दा सन्मान व व्याख्यानास उपस्थिती, दु. ३ वा. सोलापूर येथे शहिद अशोक कामटे हॅडबॉल चषक चे उद्घाटन, सायं. ५ वा. अरण येथे श्री.संत सावता माळी संस्थान दर्शन, सायं.६.३० वा. पंढरपूर येथे श्री.विठ्ठल रुक्मिणी दर्शन.

      असा आ.रोहितदादा पवार यांचा नियोजित दौरा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!