वेळापूर विकास सेवा सोसायटीकडून १५ टक्के लाभांश वाटप.

विजयदिप न्यूज.
वेळापुर (ता.माळशिरस) येथील वेळापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटी ने संस्थेच्या सभासदांना सन २०१९/२० च्या नफ्यावर १५ टक्के प्रमाणे लाभांश वाटप करण्यात आला असल्याची माहिती चेअरमन अमरसिंह माने-देशमुख यांनी दिली.

लाभांश वाटपाच्या प्रारंभी संस्थेचे जेष्ठ सभासद विठ्ठलराव माने-देशमुख, चेअरमन अमरसिंह माने-देशमुख व उपस्थित सर्व जेष्ठ सभासदांच्या हस्ते सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
लाभांश वाटप जेष्ठ सभासद विठ्ठलराव माने-देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.
वेळापूर विकास सेवा सोसायटीची वार्षिक उलाढाल २ कोटी झालेली असून बँकेत रिझर्व फंड १ कोटी ६० लाख रुपये आहे. बँकेचे शेअर्स ३० लाख रुपये आहेत. चालू वर्षी संस्थेला २४ लाख रुपये नफा झालेला आहे. याचबरोबर संस्थेने १५ टक्के लाभांश वाटप केलेला आहे. सभासदांनी वसुलीसाठी संस्थेला केलेल्या सहकार्यामुळेच आपणास लाभांश मिळाला आहे. असेही माने-देशमुख म्हणाले.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती सर्व व्यवहार ठप्प असताना व यावर्षी झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकर्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. तर दिवाळीचा सन असल्यामुळे शेतकर्यांकडे पैशाची कमतरता होती. अशातच वेळापूर विकास सेवा सोसायटीने केलेल्या लाभांश वाटपामुळे संस्थेच्या सभासदात आनंदाचे वातावरण आहे.
वेळापूर विकास सेवा सोससायटी ही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे.
लाभांश वाटप कार्यक्रमास विठ्ठलराव माने-देशमुख, पांडुरंग माने-देशमुख, माधवराव माने-देशमुख, व्हा.चेअरमन महादेव ताटे, शहाजी कदम, प्रकाश माने-देशमुख, ओंकार माने-देशमुख, शिवाजी सावंत, श्रीधर देशपांडे, अशोक साबळे, दत्तात्रय बनकर, रंगनाथ माने, मारुती चव्हाण, बाळासाहेब माने-देशमुख, शृंगराज माने-देशमुख, श्रीकृष्ण देशपांडे, जगन्नाथ गायकवाड, हरी घोरपडे, श्रीमंत सावंत, संतोष माने-देशमुख, उत्तम मगर, संजय भाकरे, अजिनाथ भाकरे, चंद्रकांत पिसे, अजिनाथ अडसूळ, संतोष सावंत, सतीश माने-देशमुख, अनंत माने-देशमुख, सुधाकर इनामदार, दत्तात्रय माने, नामदेव जगदाळे, शिवाजी आडत, दत्तात्रय म्हेत्रे, तसेच सचिव भागवत मिले व सभासद उपस्थित होते.