इतरसोलापूर जिल्हा

माळशिरस तालुक्यातील ४६ ग्रामपंचायतीवर प्रशासक.

४६ ग्रामपंचायतीचा कारभार १० प्रशासकांच्या हाती.

विजयदिप न्यूज.

            माळशिरस तालुक्यातील नोव्हेंबर-२०२० मध्ये मुदत संपणाऱ्या एकूण ४६ ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आल्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी काढला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होईपर्यंत या ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासनाच्या हाती देण्यात आला असुन आता प्रशासकाच्या माध्यमातूनच ग्रामपंचायतीचे कामकाज चालणार आहे. नोव्हेंबर महिन्यात माळशिरस तालुक्यातील ४६ ग्रामपंचायत सदस्यांची मुदत संपणार आहे. 

            कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवरती निवडणूक प्रक्रिया राबविणे शक्य नसल्याने शासनाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीवर केंद्रप्रमुख, कृषी अधिकारी, पर्यवेक्षिका, विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका, मुख्याध्यापकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

      प्रशासक यांना ज्या दिवशी ग्रामपंचायतीची मुदत संपणार आहे त्या दिवसापासून नेमून दिलेल्या ग्रामपंचायतीकडील प्रशासक पदाचा कार्यभार स्वीकारावयाचा आहे. प्रशासकपदी नेमणूक झालेल्या व्यक्तीस मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील तरतुदीनुसार सरपंच पदाचा अधिकार व कर्तव्य प्राप्त होणार आहेत.

अ.क्रग्रामपंचायतीचे नावप्रशासकाचे नावंपदमुदत संपण्याचा दिनांक
१.कळबोलीएम.डी नकाते  विस्तार अधिकारी (शि)१६/११/२०२०
२.भांबएन.एम कोंडगुळेविस्तार अधिकारी (आ)१६/११/२०२०
३.कुरभावीबी.ए सुळकृषी अधिकारी१६/११/२०२०
४.उंबरे (वे)बी.डी मुंडफणेविस्तार अधिकारी (कृ)१६/११/२०२०
५.खळवेबी.डी मुंडफणेविस्तार अधिकारी (कृ)१६/११/२०२०
६.बोरगावएन.एच चव्हाणकृषी अधिकारी१४/११/२०२०
७.शिंदेवाडीबी.ए सुळकृषी अधिकारी१४/११/२०२०
८.कोथळेबी.ए सुळकृषी अधिकारी१४/११/२०२०
९.लोणंदव्ही.बी कोळेकरविस्तार अधिकारी (पं)१४/११/२०२०
१०.फोंडशिरसएम.डी नकाते  विस्तार अधिकारी (शि)१४/११/२०२०
११.शेंडेचिंचपी.एच कुंभारविस्तार अधिकारी (सा)१४/११/२०२०
१२.दसुरए.टी डोकेविस्तार अधिकारी (पं)१४/११/२०२०
१३.गणेशगावएन.एम कोंडगुळेविस्तार अधिकारी (आ)१४/११/२०२०
१४.गिरझणीएन.एच चव्हाणकृषी अधिकारी१४/११/२०२०
१५.अकलूजए.टी डोकेविस्तार अधिकारी (पं)१३/११/२०२०
१६.एकशिवएम.डी नकाते  विस्तार अधिकारी (शि)१२/११/२०२०
१७.मिरेबी.डी मुंडफणेविस्तार अधिकारी (कृ)१२/११/२०२०
१८.फडतरीव्ही.बी कोळेकरविस्तार अधिकारी (पं)१२/११/२०२०
१९.गिरवीव्ही.बी कोळेकरविस्तार अधिकारी (पं)१२/११/२०२०
२०.मळोलीपी.एच कुंभारविस्तार अधिकारी (सा)१२/११/२०२०
२१.विठ्ठलवाडीएन.एच चव्हाणकृषी अधिकारी१२/११/२०२०
२२.बोंडलेए.टी डोकेविस्तार अधिकारी (पं)१२/११/२०२०
२३.संग्रामनगरए.टी डोकेविस्तार अधिकारी (पं)१२/११/२०२०
२४.कोंडबावीए. एम सरवदेविस्तार अधिकारी (कृ)१२/११/२०२०
२५.तांबवेपी.एच कुंभारविस्तार अधिकारी (सा)१२/११/२०२०
२६.मांडवेके. व्ही खरातविस्तार अधिकारी (पं)१०/११/२०२०
२७.नातेपुतेव्ही.बी कोळेकरविस्तार अधिकारी (पं)१०/११/२०२०
२८.शिंगोर्णीके. व्ही खरातविस्तार अधिकारी (पं)१०/११/२०२०
२९.तांदुळवाडीपी.एच कुंभारविस्तार अधिकारी (सा)१०/११/२०२०
३०.गारवाडए. एम सरवदेविस्तार अधिकारी (कृ)१०/११/२०२०
३१.महाळूंगबी.डी मुंडफणेविस्तार अधिकारी (कृ)१०/११/२०२०
३२.माळखांबीएन.एच चव्हाणकृषी अधिकारी१०/११/२०२०
३३.बिजवडीबी.डी मुंडफणेविस्तार अधिकारी (कृ)१०/११/२०२०
३४.कुसमोडके. व्ही खरातविस्तार अधिकारी (पं)०८/११/२०२०
३५.येळीवके. व्ही खरातविस्तार अधिकारी (पं)०८/११/२०२०
३६.विझोरीए. एम सरवदेविस्तार अधिकारी (कृ)०८/११/२०२०
३७.बांगर्डेएम.डी नकातेविस्तार अधिकारी (शि)०८/११/२०२०
३८.माणकीएन.एम कोंडगुळेविस्तार अधिकारी (आ)०८/११/२०२०
३९.रेडेएन.एम कोंडगुळेविस्तार अधिकारी (आ)०८/११/२०२०
४०.बचेरीके. व्ही खरातविस्तार अधिकारी (पं)०८/११/२०२०
४१.गोरडवाडीव्ही.बी कोळेकरविस्तार अधिकारी (पं)०८/११/२०२०
४२.चाकोरेए. एम सरवदेविस्तार अधिकारी (कृ)०८/११/२०२०
४३.पिरळेएम.डी नकाते  विस्तार अधिकारी (शि)०८/११/२०२०
४४.विजयवाडीएन.एच चव्हाणकृषी अधिकारी०७/११/२०२०
४५.जळभावीएन.एम कोंडगुळेविस्तार अधिकारी (आ)१०/१०/२०२०
४६.तोंडलेए.टी डोकेविस्तार अधिकारी (पं)१०/१०/२०२०

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!