इतर

‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात जिल्हा परिषद शाळा, मुंडफणेवाडी शाळेस माळशिरस तालुक्यात प्रथम क्रमांक.

टिम: विजयदिप न्यूज.

सोलापूर जिल्हा परिषद अंतर्गत ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ या उपक्रमात माळशिरस तालुक्यातील महाळूग केंद्रातील जिल्हा परिषद व्दिशिक्षकीय शाळा मुंडफणेवाडी(महाळूंग) 17या शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 

सोलापूर येथील यशवंत सभागृहांमध्ये पारितोषिकाचे वितरण करण्यात आले. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे कार्यक्रमास ऑनलाइन उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी  यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी  मिलिंद शंभरकर, सोलापूर ग्रामीण पोलिस आयुक्त तेजस्विनी सातपुते, शिक्षणाधिकारी किरण लोहार आदि मान्यवर उपस्थित होते.

जिल्हा परिषद शाळा,  मुंडफणेवाडी(महाळूंग) च्या वतीने मुख्याध्यापक समीर लोणकर,  सहशिक्षिका अर्चना वाघ, शुभांगी लोणकर, लक्ष्मण वाघ यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या संकल्पनेतून शिक्षण विभाग व पंचायत समिती माळशिरस यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ अभियान राबवण्यात आले होते. मुंडफणेवाडी शाळाने शाळेकडे येणारा रस्ता, प्रवेशद्वार, शाळेचे नाव, पार्किंग व्यवस्था, कचरा व्यवस्थापन, एक पद, एक वृक्ष, परसबाग, मनेरेगा, खेळायचे मैदान, संरक्षण भिंत, पाणीपुरवठा, हॅन्डवॉश, स्वच्छतागृह, शालेय इमारत, किचन शेड, प्रयोगशाळा, ग्रंथालय, मुख्याध्यापक कार्यालय, तीन पेट्या, वर्गखोली, सूचनाफलक, ई-लर्निंग सुविधा, डॉक्युमेंट्री, आरोग्य तपासणी, लोकसहभाग, शाळा सिद्धी, स्वाध्याय सेतू, अभ्यासक्रम, पारावरची शाळा असे उपक्रम शाळेत राबविले आहेत.

गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, विस्तार अधिकारी प्रदीप करडे, महालिंग नकाते, केंद्रप्रमुख नितीन साने यांनी नेहमीच मार्गदर्शन केले तसेच हा पुरस्कार शाळेस मदत करणाऱ्या आणि शिक्षकांना पाठबळ देणाऱ्या सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांना, विद्यार्थ्यांना समर्पित करत आहे समीर लोणकर यांनी सांगितले. 

जिल्हा परिषद शाळेचं रुप पालटलं.

स्वच्छ शाळा व सुंदर शाळा हा उपक्रम मुंडफनेवाडी शाळेत राबवण्यात आला. शिक्षकांनी स्वखर्चातून व लोकसहभागातून शाळेच्या सुशोभीकरणावर भर देण्यात आला. शाळेची रंग-रंगोटी तसेच शाळा डिजिटल केली.  दोन्ही शिक्षकांनी टीव्ही, संगणक, टॅब सुद्धा खरेदी केले. त्याचबरोबर शौचालय, पिण्याची पाण्याची टाकी, परसबाग, पार्किंग तसेच विद्यार्थ्यांसाठी खेळण्यासाठी लागणारे साहित्य याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे शाळेच्या इमारती अधिकच सुंदर दिसू लागली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!