श्रीपूर येथे कै. यश कोठारी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ७१ रक्तदात्यांचे रक्तदान.

टीम विजयदिप न्यूज.
श्रीपुर (ता.माळशिरस) येथे कै.यश कोठारी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ब्रिमा सागर महाराष्ट्र डिस्टिलरीज लिमिटेड श्रीपुर आणि सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील ब्लड बँक, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
रक्तदान कार्यक्रमाच्या प्रारंभी कै. यश कोठारी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यानंतर झालेल्या रक्तदान शिबीराचे उदघाटन उद्योग समुहाचे चेअरमन दीपक कोठारी डॉ.संतोष दोशी व डॉ. संतोष खडतरे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमाला डायरेक्टर भरतकुमार सेठिया, हिनेश जोबनपुत्र, डे. मॅनेजर चंद्रकांत भागवत, डे. मॅनेजर नरेश पाठक, डॉ. सुधीर पोफळे, बाळासाहेब पिसाळ, सुकुमार मंडल, बाबुलाल देशपांडे, जयंत अरगडे, सतीश डिंगरे, सिताराम देऊसकर, अमित तळवळकर, श्रीकांत सहस्त्रबुद्धे, भारत ढेरे, अरविंद इंगळे, प्रशांत उघडे, दत्तात्रय दातार, विठ्ठल सावंत, विलास खोत, उत्तम कुंभार, टाईम कीपर नानासाहेब केचे, सुरक्षा अधिकारी भागवत पारसे, अफजल शेख आदी मान्यवर कामगार उपस्थित होते.