विजयदिप न्यूज.
कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणावरती पसरला आहे. अशा प्रसंगी श्रीपूर(ता.माळशिरस) येथिल श्री. पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने कामगार व सर्वसामान्यांसाठी कोवीड सेंटर उघडून मोठे कार्य केले आहे. असे प्रतिपादन अकलुज येथिल प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.एम.के. इनामदार यांनी केले.
स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या ८५ व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून पांडुरंग कारखान्याच्या कार्यस्थळावर रक्तदान शिबिर, कोविड केअर सेंटरचे उद्घाटन, ज्येष्ठ नागरिक सत्कार, कोविड योध्दा सत्कार व मातोश्री वृध्दाश्रम गोपाळपुर धान्य वाटप इत्यादी सामाजीक उपक्रम राबविणेत आले. त्यामध्ये डॉ. इनामदार बोलत होते.
याप्रसंगी कारखान्याचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष वसंतनाना देशमुख, अकलुज येथिल प्रसिद्ध डॉ. अतुल फडे, डॉ. बाहुबली गांधी, डॉ. फडे, संचालक झांबरे, बाळासाहेब यलमार, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, डॉ. हरिश्चंद्र सावंत पाटील, आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. इनामदार म्हणाले की, आज कोरोनाचा प्रादुर्भाव कमी कमी होत चालला असला तरी यापुढे मास्क, सोशल डिस्टन्स, व सातत्याने हात स्वच्छ करणे हे कायम स्वरुपी अंगीकारावे लागणार आहे.
कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कै. सुधाकरपंत परिचारक यांची जयंती विधायक उपक्रमाने साजरी करणे हा उद्देश ठेवून आज कोवीड सेंटर, रक्तदान शिबीर, जेष्ठ व्यक्तिचा सत्कार, या कार्यकमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
याप्रसंगी जेष्ठ नागरिक म्हणून तुकाराम कांबळे, प्रमोद मदाल, अशोक पंडीत, बबन कुलकर्णी यांचा सत्कार करणेत आला.
रक्तदान शिबीरात ५१ जणांनी सहभाग नोंदवला. याप्रसंगी डॉ. सुधीर पोफळे, संचालक बाळासाहेब यलमार यांनी आपले मनोगता मध्ये कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या कार्यास उजाळा दिला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन सिव्हील इंजिनिअर हणमंत नागणे यांनी केले. आभार सभापती अरुण घोलप यांनी मानले.
Back to top button
error: Content is protected !!