महाराष्ट्रमाळशिरस तालुकाशेतीविषयकसोलापूर जिल्हा

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून सभासदांना दिवाळी सणासाठी सवलतीच्या दराने साखर वाटप सुरु.- व्हा.चेअरमन वामनभाऊ ऊबाळे

टिम: विजयदिप न्यूज.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याकडून दरवर्षी प्रमाणे दिपावली या  सणासाठी सभासद, ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात साखर वाटप करण्यात येते यावर्षीही १ सप्टेंबर पासून सवलतीच्या दराने साखर वाटप सुरु करण्यात आली असल्याची माहिती कारख्यान्याचे व्हा.चेअरमन वामनभाऊ ऊबाळे यांनी दिली.

याबाबत अधिक माहीती देताना ते म्हणाले की, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यामार्फत संस्थापक चेअरमन आ.बबनराव शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली दरवर्षी सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रती सभासद ५० किलो साखर सवलतीच्या दराने घरपोहोच वाटप करण्यात येते. याही वर्षी सन २०२२ च्या दिवाळी सणासाठी सभासद व ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना ५० किलो साखर सवलतीच्या दराने वाटप करण्याचा निर्णय कारखाना व्यवस्थापनाने घेतलेला आहे. त्याप्रमाणे युनिट नं.१ पिंपळनेर व युनिट नं.२ करकंब येथील सभासद, ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रती सभासद ५० किलो साखर घरपोहोच वाटप करण्यास सुरुवात झालेली आहे.

साखर वाटपाचा शुभारंभ म्हैसगाव येथून करण्यात आला. सभासद शेतकऱ्यांना घरपोहोच साखर वाटप  करणारा विठ्ठलराव शिंदे कारखाना एकमेव कारखाना आहे अशी माहिती कारखान्याचे व्हा.चेअरमन वामनभाऊ उबाळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!