शेतीविषयक

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन संपन्न.

टीम विजयदिप न्यूज.

श्रीपूर (ता.माळशिरस) येथील श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१-२२ साठीच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम कारखान्याचे माजी चेअरमन दिनकरराव मोरे यांच्या शुभहस्ते व कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक, व्हा. चेअरमन वसंतराव देशमुख, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी उपस्थित संपन्न झाला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती रोलर पुजनाचा कार्यक्रम साध्या पद्धतीने घेण्यात आला.

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने येणाऱ्या गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये ११ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असून या हंगामातील संपूर्ण ऊसाची ऊस तोडणी व वाहतूक करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व यंत्रणा कारखान्याने उभारली आहे. तसेच वाहतूक ठेकेदार व तोडणी ठेकेदार यांचे करार करण्याचे काम सध्या सुरू आहे. ऑफ सीजन मध्ये कारखान्यामध्ये करावे लागणा-या बदलाची कामे युद्धपातळीवर सुरु असून ती वेळेत पूर्ण करून कारखाना गाळपास वेळेत तयार केला जाईल अशी माहिती कारखान्याची कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी दिली.

यावेळी कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक म्हणाले की , कारखान्याचे कार्यकारी संचालक, अधिकारी यांनी गत हंगामात उत्कृष्ट काम केले त्याच प्रमाणे येणा-या हंगामातही अखंडित काम करून कारखान्याचे गाळपाची उद्दिष्ट पूर्ण करावे. तसेच कारखान्याची अंतर्गत असणारी सर्व कामे गाळप हंगाम सुरू होण्यापूर्वी वेळेत करून घ्यावीत कारखाना लवकर सुरू करण्यासाठी कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी कारखान्याचे संचालक दिलीपराव चव्हाण, सुरेशराव आगवणे, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमार, बाळासाहेब शेख, अरुण घोलप, नागनाथ शिंदे, शिवाजीराव साळुंखे, चंद्रकांत फाटे, ब्रह्मदेव पवार, आनंदाराव अरकीले, नामदेव झांबरे, गुलाब पोरे इत्यादी संचालक तसेच कारखान्याचे अधिकारी आर.बी पाटील, एम.आर कुलकर्णी, संतोष कुमठेकर, रवींद्र काकडे, सय्यदनुर शेख, सोमनाथ भालेकर, रमेश गाजरे, हनुमंत नागणे, महेश देशपांडे, तानाजी भोसले, सोपान कदम, युनियन पदाधिकारी व कामगार उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!