महाराष्ट्र

राज्य ग्रामसेवक संघाच्या अध्यक्षपदी तात्यासाहेब पाटील यांची बिनविरोध निवड.

…मान्यवरांच्या कडून अभिनंदनाचा वर्षाव…

बेंबळे। प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाच्या राज्याध्यक्षपदी पिंपळनेर ता. माढा येथील ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांची राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वानुमते निवड करण्यात आली.पाटील यांनी ग्रामसेवक संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष म्हणून १० वर्ष ग्रामसेवक संवर्गाच्या प्रश्नांबाबत जिल्हा व राज्य पातळीवर केलेल्या कामाची दखल घेत त्यांची निवड करण्यात आली.

नुतन राज्याध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांचा निवडीनंतर सत्कार करताना मावळती राज्य कार्यकारिणी.

दिनदयाळ प्रबोधिनी, यवतमाळ येथे २६ सप्टेंबर रोजी मावळते अध्यक्ष विजय मसकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत राज्य कार्यकारिणीचा कार्यकाल संपल्याने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. राज्यातील उपस्थित राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांच्या सर्वानुमते ग्रामसेवक संघाच्या प्रथेप्रमाणे निवडणूक न घेता सन २०२१ ते २०२६ या कार्यकाळासाठी राज्याध्यक्षपदी तात्यासाहेब पाटील यांची निवड करण्यात आली. याच वेळी राज्य पातळीवरील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी पण करण्यात आल्या. राज्य सरचिटणीसपदी कोल्हापूरचे एस.डी.पाटील, राज्य उपाध्यक्ष संजय मिरजकर, सहसचिव लक्ष्मण नागरगोजे, राज्य कार्याध्यक्षपदी सागर मोकाशी, राज्य प्रसिद्धी प्रमुखपदी नवनाथ गोरे यांची निवड करण्यात आली. या सभेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष राजेंद्र महल्ले, सरचिटणीस लक्ष्मण नागरगोजे यांनी नियोजन केले.

सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार मावळते अध्यक्ष विजय मसकर व सरचिटणीस के.आर.किरूळकर यांनी केला. यावेळी सोलापूर जिल्हा ग्रामसेवक संघाचे जिल्हा सचिव कैलास सुरवसे, ग्रामसेवक पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन के.के.काशीद, माढा तालुका जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन सतिश भोंग, शंकर गवळी उपस्थित होते.

या निवडीबद्दल तात्यासाहेब पाटील यांचे विविध स्तरावरातील अनेक मान्यवरांच्या कडूनअभिनंदन होत आहे.

प्रशासनाला सहकार्य करत ग्रामसेवकांना तणावमुक्त करून, त्यांचे मनोधैर्य वाढवित, ग्रामसेवक संवर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार –
तात्यासाहेब पाटील, नुतन अध्यक्ष.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!