महाराष्ट्रमाळशिरस तालुका

माळशिरस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदी संजय देशमुख तर सचिवपदी माने-देशमुख.

विजयदिप न्यूज.

माळशिरस तालुका पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा माजी अध्यक्ष निनाद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अकलूज येथील शासकीय विश्रामगृहावर खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी नुतून कार्यकारणी निवड बिनविरोध झाली. यामध्ये अध्यक्षपदी दै.संचार चे माळशिरस प्रतिनिधी संजय देशमुख यांची तर सचिवपदी दै.सकाळ चे प्रतिनिधी दिनेश माने-देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मार्गदर्शक विनोद बाबर यांनी केले. यावेळी गेल्या वर्षभरातील कामकाजाची माहिती मावळते अध्यक्ष निनाद पाटील यांनी दिली. सहसचिव लक्ष्मण राऊत यांनी वर्षभरात झालेला खर्च व शिल्लक वाचून दाखवली. यानंतर नवीन कार्यकारिणीच्या निवडीच्या प्रक्रियेस प्रारंभ करण्यात आला. सर्वानुमते या निवडी निवडणूक न घेता बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला.

नूतन पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांच्या निवडीचे वाचन मावळते अध्यक्ष निनाद पाटील यांनी केले त्यास सर्व सदस्यांनी एकमुखी मान्यता दिली. यानंतर कार्याध्यक्ष एल.डी.वाघमोडे, माजी अध्यक्ष निनाद पाटील, मार्गदर्शक विनोद बाबर यांच्या हस्ते नुतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मनोज राऊत, उदय कदम, संजय हुलगे, विजयकुमार देशमुख, तानाजी वाघमोडे, संजय पवार, ओंकार आडत यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

नवीन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे





अध्यक्ष – संजय देशमुख

उपाध्यक्ष - शाहरुख मुलाणी

उपाध्यक्ष - लक्ष्मण राऊत

सचिव- दिनेश माने-देशमुख

सह सचिव- बंडू पालवे

खजिनदार- नितिन मगर

सोशल मिडिया प्रमुख- स्वप्नीलकुमार राऊत

कायदेशीर सल्लागार- अ‍ॅड.जी.पी कदम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!