सोलापूर जिल्हा

आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमीत्त ‘पांडुरंग सहकारी’मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन.

कोरोना पश्चात होणारे आजार; सुप्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ.एम.के. इनामदार यांचे व्याख्यान संपन्न.

टिम विजयदिप न्यूज.

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखान्यामध्ये कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोना पश्चात होणारे आजार व त्यावरील उपचार या संबंधी सुप्रसिध्द हदयरोग तज्ञ डॉ.एम.के. इनामदार यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजीत केले होते. यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, संचालक बाळासाहेब यलमार आदि मान्यवर उपस्थितीत होते.

व्याख्यानाची सुरुवात कारखान्याचे संस्थापक चेअरमन कै.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन करण्यात आली.

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, डॉ.एम.के. इनामदार, संचालक बाळासाहेब यलमार, अधिकारी व कर्मचारी यांनी कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांत परिचारक यांच्या वाढदिवसानिमीत्त शुभेच्छा दिल्या.

कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात सुप्रसिध्द डॉ.एम.के. इनामदार यांनी वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करुन ते अकलूज परिसरातील नव्हे तर सोलापूर जिल्हयातील अत्यंत हुषार व नावाजलेल्या डॉक्टरां पैकी एक आहेत. त्यामुळे त्यांची परिसरातील लोकांबरोबरच जिल्हयातील लोकांनाही गरज भासू लागली आहे. त्यांचेकडे अकलूजसह संपूर्ण सोलापूर जिल्हयातील दैवत म्हणून लोक पाहू लागले आहेत.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ.एम.के.इनामदार यांनी कोविड काळात घ्यावयाची काळजी व कोविड नंतर होणारे आजार याबाबत विस्तृत माहिती देत असताना सांगितले की, कोविड हा आजार अत्यंत गंभीर स्वरुपाचा असून तो सहजरित्या घेण्यासारखा नाही. कोविड झालेल्या व्यक्तीला अत्यंत गंभीर स्वरुपाच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

सुमारे दिड वर्षापासून कोविड पेशंट तपासत असताना अनेक अनुभव आले. यामध्ये एखादया व्यक्तीला कोविडची कोणतीही लक्षणे दिसत नसतील परंतु त्याला कोविड झालेला असतो व तो कोविड त्याव्यक्तीला अंतस्त पोखरत असतो कोविडमुळे होणारे परिणाम हे दिर्घ स्वरुपाचे असतात. यामधील व्यक्तीला ऑक्सीजनची कमतरता भासते. तसेच इतरही समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे कोविड झालेल्या व्यक्तीला नंतरच्या काळातही अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे असेही, डॉ.इनामदार म्हणाले.

यावेळी डॉ.एम.के.इनामदार यांनी उपस्थित कामगारांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे देवून शंकांचे निरसन अत्यंत चांगल्या प्रकारे केले. या मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कामगारांना खूप मोठया प्रमाणात लाभ होवून कोविड होऊ नये व कोविड बरा झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत अत्यंत उपयुक्त असे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ.एम.के.इनामदार यांनी वैद्यकीय क्षेत्रात आलेल्या अनेक अनुभवांचे कथन केले. वयोवृध्द व्यक्तींबरोबरच ब्लड प्रेशर, शुगर व इतर आजार असणाऱ्या व्यक्तींनीही लसीकरण करुन घेणे आवश्यक असलेचे नमूद केले. 

कार्यक्रमास वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील, प्रॉडक्शन मॅनेजर एम.आर.कुलकर्णी, चिफ अकौंटंट रविंद्र काकडे, इस्टेट मॅनेजर रमेश गाजरे, सिव्हील इंजीनिअर हणमंत नागणे, इन्स्ट्रुमेंट मॅनेजर समीर सय्यद, कॉम्प्युटर इन्चार्ज तानाजी भोसले, हेड टाईम किपर एस.एन.कदम, सहा. कार्यालयीन अधिक्षक भिमराव बाबर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुधीर पोफळे यांनी केले. तसेच आभार डॉ. प्रमोद पवार यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!