प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशात सिंहगड इन्स्टिट्युट महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर.

उत्कृष्ट प्लेसमेंट मुळे “सिंहगड पॅटर्नला” विद्यार्थ्यांची सर्वाधिक पसंती
टीम विजयदिप न्यूज.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया सुरू असुन शैक्षणिक वर्ष २०२०-२१ या वर्षातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील प्रथम फेरीला महाराष्ट्रातून तब्बल ४११८ विद्यार्थ्यांनी “सिंहगड इन्स्टिट्युट” ला सर्वाधिक पंसती दिली आहे. महाराष्ट्रातील सर्व अभियांत्रिकीच्या महाविद्यालयापेक्षा सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये प्रथम वर्ष अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असुन महाराष्ट्रातून सिंहगड इन्स्टिट्युट प्रथम क्रमांक आहे.
विद्यार्थ्यांना सर्व सोईनियुक्त, तणावमुक्त शिक्षण पद्धती, उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, विद्यापीठातील गुणवत्ता, उद्योजक क्षेत्रातील करिअरच्या संधी, सामाजिक भान या गोष्टींवर सिंहगड इन्स्टिट्युट गेल्या अनेक वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून देशाला फरफेक्ट इंजिनिअर देत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन नये यासाठी सिंहगड इन्स्टिट्युट ने सोशल मिडियाच्या माध्यमातून ऑनलाईन लेक्चर आयोजित करून विद्यार्थ्यांना शिक्षण दिले आहे.
प्रत्येक वर्षी सिंहगड इन्स्टिट्युट मधुन होणारे प्लेसमेंट हे सर्वाधिक असुन चालु शैक्षणिक वर्षात १४३१ हून अधिक विद्यार्थ्यांना नामंकित कंपनीत नोकरी दिली आहे. सिंहगड इन्स्टिट्युट मधुन शिक्षण घेतलेले अनेक इंजिनिअर देशातील सर्वाधिक कंपनीत आजही सेवेत आहेत. सिंहगड इन्स्टिट्युट ला नॅक “ए” ग्रेड मिळाला असल्याने विद्यार्थ्यांनी “सिंहगड पॅटर्न” सर्वाधिक पसंती दिली आहे.
प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशात सिंहगड इन्स्टिट्युट मधील दिल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीवर, उच्चविद्याभूषित प्राध्यापक, संशोधन प्रक्रिया, भविष्यातील दृष्टीकोन, प्लेसमेंट साठी मोठा समुह उपलब्ध होत असल्याने महाराष्ट्रातील ४११८ विद्यार्थ्यांनी सिंहगड इन्स्टिट्युट ला प्रथम पंसती दिली आहे. प्रथम व द्वितीय फेरीत “सिंहगड पॅटर्न” ला महाराष्ट्रातील सर्वाधिक पंसती दिली आहे. अनके विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये प्रवेश मिळाला नव्हता त्या विद्यार्थ्यांना दुस-या फेरीत प्रवेश निश्चित करता आला आहे. दुसर्या कॅप राऊंड फेरीत सर्व जागा खुल्या झाल्याने सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये प्रवेश न मिळालेल्या अनेक विद्यार्थ्यांना सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये अभियांत्रिकी शिक्षणाची संधी मिळाली आहे.
अधिक माहितीसाठी पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्युटचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे- 7350508899, प्रा. सोमनाथ कोळी- 8378017546 या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आलेआहे.
अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात ३० वर्षापासून “सिंहगड पॅटर्नचा” दबदबा कायम असल्याने महाराष्ट्रातील सर्वाधिक प्लेसमेंट असलेल्या सिंहगड इन्स्टिट्युट ला प्रथम वर्ष अभियांत्रिकी प्रवेशात विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला असुन सिंहगड इन्स्टिट्युट महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. शैक्षणिक वर्ष -२०२१ वर्षांसाठी ४११८ विद्यार्थ्यांनी पसंती दर्शविली आहे. उत्कृष्ट प्लेसमेंट व उज्ज्वल निकाल यामुळे विद्यार्थी सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षणासाठी प्रवेश निश्चित करत आहेत. प्राचार्य सिंहगड इन्स्टिट्युट ,पंढरपूर.