इतर
स्वामीराज भिसे यांचा पुणे विद्यापीठातर्फे सत्कार.

सेट परिक्षेत केले उज्वल यश संपादन.
अकलूज/प्रतिनिधी
जेष्ठ पत्रकार सूर्यकांत भिसे यांचे सुपूत्र स्वामीराज भिसे यांनी सेट परिक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला .
स्वामीराज भिसे हे पुणे विद्यापीठात सांस्कृतिक विभाग समन्वयक या पदावर कार्यरत असून विद्यार्थी कल्याण मंडळाच्या माध्यमातून नोकरी करीत त्यांनी सेट परिक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल त्यांचा विद्यापीठाचे कुलगरु डॉ.नितीन करमळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्र-कुलगुरु डॉ.एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ.प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे, सुनेत्रा पवार, प्रसेनजीत फडणवीस, डॉ.संजय चाकणे, डॉ.विलास उगले, डॉ.मनोहर चासकर, अधिसभा सदस्या बागेश्री मंठाळकर, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ.संतोष परचुरे यांच्या सह मान्यवर उपस्थित होते.