शेतीविषयक

जांबूड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध.

टिम: विजयदिप न्यूज

जांबुड (ता.माळशिरस) येथील जांबुड विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी १३ जागांसाठी १३ उमेदवारांचे अर्ज राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही कोरके यांनी बिनविरोध उमेदवारांची यादी जाहीर केली.

जांबूड विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक प्रक्रिया पार पाडली.  या निवडणुकीत एकूण १३ जागांसाठी २३ उमेदवारांनी अर्ज दाखल झाले होते. दरम्यान ३१ मे २०२२ रोजी अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी १० उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने सोसायटीच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या.

जांबूड विकास सोसायटीचे माजी चेअरमन बबनराव खटके, माजी सरपंच शिवाजी कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही  निवडणूक बिनविरोध पार पडली.

यावेळी शिवाजी केचे, विजय कचरे, लक्ष्मण धोंडीराम खटके, पांडुरंग हुंबे, अर्जुन अडसूळ, भगवान शेंडगे, माणिक गुळमंकर, शरद मारकड, ग्रामपंचायत सदस्य नरहरी कचरे, विलास केचे, किसन भोसले, तुकाराम खटके आदि उपस्थित होते.

बिनविरोध निवड झालेले संचालक

बबनराव खटके, प्रकाश केचे, अंबादास केचे,  राहुल खटके, हरिदास केचे, महादेव निंबाळकर, बलभिम कचरे, मौला कळवात, हणुमंत पिसाळ, मंगल भोसले, विजय वेदपाठक, अनिता घोगरे, सुग्रीव चंदनशिव हे उमेदवार बिनविरोध झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!