महाराष्ट्र
भीषण अपघातात ४ जण जागीच ठार.

कासेगांव हद्दीत सांगोला-पंढरपूर रोडवर झाला अपघात.
टीम विजयदिप न्यूज.
पंढरपूर-सांगोला रोडवर कासेगाव हद्दीत सातवा मैल येथे आज स.६ वा. भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १ पुरुष, २ महिला, १ लहान मुलगी असे ४ जन जागीच ठार झाले आहेत. तर १ पुरुष गंभीर जखमी असून उपचारासाठी पंढरपूर येथे दाखल केले आहे.
प्रवासी बोलेरो जीप रस्त्यावर थांबलेल्या ट्रकला धडकल्याचे समजते. सर्व मयत व जखमी हे चंदगड जि. कोल्हापूर येथील आहेत अशी माहिती तालुका पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.
इतर जखमी कॉटेज हॉस्पिटल मध्ये आहेत