इतर

श्री.विठ्ठलाच्या महापूजेचे हे आहेत मानकरी.

विजयदिप न्यूज

विठ्ठल मंदिरात मागील ९ ते १० वर्षे विणेकरी म्हणून सेवा बजावणारे वृद्ध वारकरी कवडुजी नारायण भोयर व त्यांच्या पत्नीस यंदाच्या कार्तिकी वारीत श्री.विठ्ठल-रुक्मिणीच्या महापूजेस उपस्थित राहण्याचा मान मिळाला आहे. मंदिर समितीच्या वतीने चिठ्ठी काढून ही निवड करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली,

यावर्षी कार्तिकी यात्रा गुरूवार, दिनांक २६ नोव्हेंबर रोजी आहे. या दिवशी पहाटे २.२० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवार यांचे हस्ते श्रीची शासकीय महापुजा केली जाणार आहे.

दर वर्षी शासकीय महापूजेवेळी मानाचा वारकरी दर्शनरांगेतून निवडला जातो व त्यांना शासकीय महापूजेची संधी दिली जाते. तथापि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, यावर्षी कार्तिकी यात्रा मर्यादित व प्रतिकात्मक स्वरूपात साजरी करण्यात येत आहे. दि.२५ नोव्हेंबर ते दि.२७ नोव्हेंबर या कालावधीत श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद आहे. त्यामुळे श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात २४ तास पहारा देणारे विणेकरी यांची मा.उपमुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते होणा-या शासकीय महापूजेसाठी मानाचा वारकरी म्हणून निवड करण्याचा मंदिर समितीने निर्णय घेतला होता.

श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात पहारा देणा-या एकूण ६ विणेक-यांपैकी श्री.कवडुजी नारायण भोयर (वय-६४, रा.मु.डौलापूर, पो. मोझरी शेकापूर, ता.हिंगणघाट, जि. वर्धा) आणि सौ. कुसुमबाई कवडूजी भोयर, (वय-५५)  यांची दि.२२ नोव्हेंबर रोजी निवड करण्यात आली आहे. श्री.कवडुजी नारायण भोयर हे मागील ९ ते १० वर्षापासून मंदिरात विणा वाजवून पहारा देत आहे. ते स्वतः व त्यांचे कुटुंबिय देखील माळकरी आहेत. मागील ८ महिन्यांपासून लॉकडाऊन असताना देखील पूर्णवेळ ते मंदिरात सेवा करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!