इतर

बोरगांव येथे इंदुरीकर महाराज यांचा कीर्तन सोहळा संपन्न.

टिम: विजयदिप न्यूज.

बोरगांव (ता.माळशिरस) येथे शिवजयंती कार्यक्रमानिमित्त गुरुवार १७ मार्च रोजी विजय-प्रताप क्रीडा मंडळ व विजय-प्रताप सार्वजनिक वाचनालय, बोरगांव संयोजक प्रतापराव पाटील (उपसभापती, पंचायत समिति माळशिरस) यांच्या संयुक्त विद्यमाने समाज प्रबोधनकार इंदुरीकर महाराज यांचे भव्य कीर्तन सोहळा पार पडला.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती भाजपा नेते धैर्यशील मोहिते-पाटील, माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते-पाटील, अ‍ॅड.प्रकाशराव पाटील (बोरगांव), मदनसिंह पाटील, मानसिंह पाटील, अ‍ॅड.हनुमंतराव पाटील, शहाजीराव पाटील तसेच बोरगांव परिसरातील इतर गावातील सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटी चेअरमन, सचिव, शिक्षक व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

बोरगांव येठे शिवजयंती निमित्त मोठ-मोठे समाज प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात येतात. त्यामध्ये आजपर्यंत प्रामुख्याने अमोल कोल्हे, नितिन बानगुडे-पाटील, राज मालेगांवकर, सिंधुताई सपकाळ, इंदुरीकर महाराज यांचे कार्यक्रम झाले आहेत.

या कार्यक्रमासाठी विजय-प्रताप मित्र मंडळातील कार्यकर्त्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!