माळशिरस तालुका

वेळापूर येथे शिवशक्ती संस्थेच्या वतीने रक्तदान शिबीर.

५१ रक्तदात्यांनी केले रक्तदान.

टीम विजयदिप न्यूज.

वेळापूर (ता.माळशिरस) येथील शिवशक्ती सामाजिक बहुद्देशीय संस्थेच्या तृतीय वर्धापनदिन व जेष्ठ महिला पत्रकार कै.सौ.मंगल प्रविण बर्दापूरकर यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

वेळापूरमध्ये वेगवेगळया समाजोपयोगी उपक्रमात अग्रेसर असलेल्या या संस्थेच्या वतीने व अक्षय ब्लड सेंटर, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जेष्ठ नेते माजी उपसरपंच पांडुरंग मंडले, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष विकास वाघे, डॉ.कोरे, अजय रुपनर, अभिजित देशपांडे, शाहिन दर्जी, प्रशांत पवार, स्वप्निल शिंदे, गुना जाधव, पुजा देशमुख, उत्कर्षा देशमुख, संस्थेचे अध्यक्ष संजय मंडले,  उपाध्यक्ष महेंद्र बाबर, अतुल जाधव, दादाभाई शेख, माजिद मुलाणी, अतुल घाडगे, नरेंद्र कुलकर्णी व  संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!