महाराष्ट्रमाळशिरस तालुकासोलापूर जिल्हा

आ.राम सातपुते यांच्या १६ कोटी ५४ लाख रुपयांच्या वन पर्यटन विकास युको टुरिझमला वनमंत्र्यांचा हिरवा कंदील.

टिम: विजयदिप न्यूज

माळशिरसचे आ.राम सातपुते यांनी राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना २१ नोव्हेंबर २०२२ रोजी माळशिरस तालुक्यातील मौजे गारवड येथील वनपरिक्षेत्र गट नंबर ३५१ मध्ये पर्यटन क्षेत्रांतर्गत सुळकी, तुकाई मंदिर व क्षेत्राचा विकास करणे, मौजे रेडे येथील वनपरिक्षेत्र गट नंबर ५१ मध्ये पर्यटन क्षेत्रांतर्गत महादेव मंदिर क्षेत्राचा विकास करणे या दोन्ही कामांसाठी २ कोटी ५४ लाख रुपयांची मागणी केली होती तर याचबरोबर नातेपुते येथील गट नंबर ९०/२ पर्यटन क्षेत्रअंतर्गत विकास करण्यासाठी १४ कोटी रुपयांच्या विकास निधीची मागणी केली होती वनमंत्री ना.मुनगंटीवार यांनी प्रधान सचिवांना “अ” प्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेश दिल्याने आ.राम सातपुते यांच्या या मागणीस यश आल्याने गारवड, रेडे व नातेपुते येथील विकास कामांना चालना मिळणार आहे.

२१ नोव्हेंबर रोजी आ.राम सातपुते यांनी राज्याचे वनमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या पत्रामध्ये मौजे गारवाड येथील सुळकी तुकाई मंदिर या ठिकाणी व मौजे रेडे येथील महादेव मंदिर व क्षेत्राचा विकास करण्यासाठी लाकडी आभास असलेली स्वागत कमान तयार करणे, तारकुंपण तयार करणे, निसर्ग पायवाट व पायऱ्या व रेलिंग तयार करणे, पॅगोडा बांधणे, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र प्रसाधनग्रह बांधकाम करणे, बेंचेस, फुलांच्या बाग-बगीच्या व प्राण्यांची माहिती दर्शवणारे फलक बसवणे अंतर्गत विविध प्रकारची झाडे लावणे आदी विविध विकास कामांसाठी २ कोटी ५४ लाख रुपयांची मागणी केली होती वनमंत्र्यांनी यावर “अ” प्रमाणे शेरा मारून प्रधान सचिवांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिल्याने आ.राम सातपुते यांच्या प्रयत्नांना यश आले आहे .

याबरोबरच माळशिरस तालुक्यातील नातेपुते हे गाव आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गावर येत असून सातारा, सोलापूर व पुणे या तीनही जिल्ह्यांच्या सीमेवरील गाव असून या ठिकाणी अनेक संतांच्या पालख्या येत असून राष्ट्रीय महामार्गावर असणारे नातेपुते ही एक महत्त्वाची बाजारपेठ तर आहेच या ठिकाणी शाळा, महाविद्यालय याचबरोबर दवाखान्यांसाठी लोकांची मोठी वर्दळ असते शेजारील शिखर शिंगणापूर या ठिकाणी भक्तांची मोठी वर्दळ असते यामुळे नातेपुते येथील वनपरिक्षेत्र विभागातील गट नंबर ९०/२ पर्यटन क्षेत्रांतर्गत विकास करण्याकरता १४ कोटी रुपयांची मागणी केली असून यामध्ये

नातेपुते वनपरिक्षेत्र अधिकारी माळशिरस यांची २७ हेक्टर क्षेत्र ही जागा तीर्थक्षेत्र अंतर्गत विकास करून येणाऱ्या भाविकांना व स्थानिक नागरिकांना सुख सुविधा मिळण्यासाठी, वनांची, प्राण्यांची माहिती व्हावी याकरीता वनपरिक्षेत्राचा विकास करण्यासाठी १४ कोटी रुपयांची मागणी केली होती ना.मुनगंटीवार यांनी या मागणीलाही हिरवा कंदील दाखवून प्रधान सचिवांना “अ” प्रमाणे कारवाई करण्याचे आदेश दिल्याने या परिसरातील विकास कामांना चालना मिळणार आहे.

आ.राम सातपुते यांनी वन विभागातील क्षेत्रासाठी जवळपास १६ कोटी ५४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला हे अभिनंदनिय आहे. शासन वेगवेगळ्या प्रकारच्या सोयी सुविधा देत असते या निधीतील काही निधी पक्षांसाठी योग्य त्या ठिकाणी पाणवटे तयार करणे, लोकसहभाग वाढविणे, जुन्या वृक्षांची निगा राखणे, नवीन वृक्ष लागवडीला चालना मिळणे यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास तर होणारच नाही मात्र भविष्यातील पिढीसाठी हे उपयुक्त राहणार आहे. यामुळे हा निधी या भागातील नागरिकांबरोबरच वनविभागासाठी महत्त्वाचा आहे.

विरबहादुरसिंह मगर,

वनप्रेमी निमगाव (म)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!