मोठी बातमी; उजनी धरणामधून पुन्हा विसर्गात वाढ.

भीमा नदीत सोडला जातोय ४० हजार क्युसेक्स विसर्ग.
टीम विजयदिप न्यूज.
उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येत असलेल्या विसर्गात काल रविवार दि.१० ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजता वाढ करण्यात आली असून धरणाचे १६ दरवाजे ०.८५ मीटर ने उचलण्यात आले आहेत. त्यामधून ४० हजार क्युसेक्स विसर्ग भीमा नदीत सोडण्यात येत आहे.
उजनी धरण पूर्णक्षमतेने भरलेलेल असून आज सोमवार दि.११ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता धरणाची टक्केवारी ११०.१४ टक्के एवढी झालेली आहे. धरणात एकूण पाणीसाठा १२२.६६ टीएमसी तर उपयुक्त पाणीसाठा ५९ टीएमसी एवढा आहे.
उजनी धरणात दौंड येथून १२ हजार ३५० क्युसेक्स विसर्ग येत आहे. याचबरोबर धरण बॅक वॉटर क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात धरणात पाण्याची आवक होत आहे.
दरम्यान नीरा खोर्यातील वीर धरनामधून नीरा नदीत ४६३७ क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. वीर व उजनी धरणातून सोडण्यात येत असणारा विसर्ग तसेच फलटण, बारामती, इंदापूर, माळशिरस, माढा तालुक्यात मागील दोन दिवसात झालेल्या दमदार पावसामुळे या भागातील ओढे-नाले तुडुंब भरून वाहत आहेत व हे सर्व पाणी नीरा व भीमा नदीत मिसळत असल्यामुळे नीरा नरसिंगपुर (संगम) येथून पुढे भीमा नदीची पाणीपातळी मोठ्या प्रमानात वाढणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांनी सतर्क रहावे.
उजनी व वीर धरनामधून सोडल्या जात असलेल्या विसर्गामुळे तसेच परिसरातील ओढे व नाले यामधून येत असलेल्या पाण्यामुळे भीमा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत असून आज सकाळी ६ वा पंढरपूर येथील विसर्ग १९ हजार २८२ क्युसेक्स. तर निरा नरसिंहपुर (संगम) येथील विसर्गात ४९ हजार ७० क्युसेक्स एवढी वाढ झालेली आहे.
सोमवार सकाळी ६ वा. उजनी अपडेट.
पाणी पातळी | ४९७.२८० मीटर |
एकूण साठा (टीएमसी) | ३४७३.७८ द.ल.घ.मी (१२२.६६ टीएमसी) |
उपयुक्त साठा (टीएमसी) | १६७०.९७ द.ल.घ.मी (५९.०० टीएमसी) |
टक्केवारी | ११०.१४ टक्के |
दौंड आवक | १२३५० क्युसेक्स. |
धरणातून सुरू असलेला विसर्ग
सिना माढा उपसा सिंचन | १४८ क्युसेक्स. |
दहिगांव उपसा सिंचन | ६३ क्युसेक्स. |
भीमा सिना जोड कालवा | १५० क्युसेक्स. |
मुख्य कालवा | १००० क्युसेक्स. |
भीमा नदी सांडवा | ४० हजार क्युसेक्स. |
एकूण | ४१ हजार ३६१ क्युसेक्स. |