धरण पाणीसाठा

सावधान: उजनी धरणाच्या सांडव्यातून भीमा नदीत विसर्ग वाढविला.

भीमा नदीत ३० हजार क्युसेक्स वेगाने पाणी सुरू.

टीम विजयदिप न्यूज.

उजनी धरणात दौंड येथून येणार्‍या विसर्गात वाढ होत असून तो १४ हजार ७५० क्युसेक्स एवढा झालेला आहे. उजनीच्या वरील घोड धरनामधून देखील सायं.६.३० वाजता ७ हजार २०० क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला असून धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातून देखील मोठ्या प्रमाणात धरणात पाण्याची आवक होत आहे. याचबरोबर धरणाची टक्केवारी १०९.६८ टक्के एवढी झालेली आहे. परिणामी उजनी धरणाच्या सांडव्यामधून रात्री ८.१५ वाजता ३० हजार क्युसेक्स वेगाने पाणी भीमा नदीत सोडले जात आहे. यामुळे भीमा नदीला पुरस्थिती निर्माण होणार आहे.

शनिवारी दि.०९ ऑक्टोबर रात्री ९ वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यास सुरवात करण्यात आली होती. सुरवातीला ५ हजार क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आला होता. त्यानंतर मध्यरात्री १२.३० वाजता १० हजार क्युसेक्स तर आज रविवारी सकाळी ८ वाजता २० हजार क्युसेक्स, दुपारी ४ वाजता २५ हजार क्युसेक्स तर आज रात्री ८.१५ वाजता त्यात वाढ करून तो ३० हजार क्युसेक्स एवढा करण्यात आला आहे.   

रविवार सायंकाळी ६ वा. उजनी अपडेट.

पाणी पातळी४९७.२६० मीटर
एकूण साठा (टीएमसी)३४६६.८४ द.ल.घ.मी (१२२.४२ टीएमसी)
उपयुक्त साठा (टीएमसी)१६६४.०३ द.ल.घ.मी (५८.७६ टीएमसी)
टक्केवारी१०९.६८ टक्के
दौंड आवक १४७५० क्युसेक्स.

धरणातून सोडला जात असलेला विसर्ग

सिना माढा उपसा सिंचन१४८ क्युसेक्स.
दहिगांव उपसा सिंचन६३ क्युसेक्स.
भीमा सिना जोड कालवा१५० क्युसेक्स.
मुख्य कालवा६५० क्युसेक्स.
भीमा नदी सांडवा३० हजार क्युसेक्स.
एकूण३१ हजार ११ क्युसेक्स.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!