इतर

बोंडले येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा.

टिम: विजयदिप न्यूज

बोंडले (ता.माळशिरस) येथे १५ ऑगस्ट रोजी ७५ व्या स्वातंत्र्य दिनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी दिवस जनहित विकास बहुद्देशीय सेवा संस्था, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बोंडले व शिंदे वस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तसेच मेजर विक्रमसिंह शिंदे यांच्या हस्ते ध्वज पूजन व ध्वज ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी सरपंच विजय देशमुख, उपसरपंच महिंद्र लोंढे, सोससायटी चेअरमन मधुकर जाधव, ग्रामपंचायत सदस्य आनंद जाधव, जनहित विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी गायकवाड, पत्रकार विजकुमार देशमुख, दिनेश माने-देशमुख आदि मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येन उपस्थित होते

यावेळी शाळेच्या मुलांनी सैन्य दलातील आर्मीच्या वेशात चित्ररथाच्या माध्यमातून तसेच मुलांना घोडयावरती बसवून प्रभात फेरी काढण्यात आली. या कार्यक्रमास गावातील सर्व ग्रामस्थ विशेष करून महिलावर्गाची उपस्थिती लक्षणीय होती.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीताने परिसर दनातून सोडण्यात आला. तसेच जनहित विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्व सदस्य यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी विशेष कष्ट घेतले.

 या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन जनहित विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे मार्गदर्शक प्रा.डॉ.संतोष हनुमंत जाधव यांच्या प्रेरणेतून व संस्थेचे अध्यक्ष प्रकाशजी गायकवाड यांच्या नियोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच युवा वर्गातून राजाभाऊ बिले, जीवन जाधव, बाळासाहेब शिंदे. रणजीत माने-देशमुख, ओंकार माने-देशमुख, तानाजी जाधव यांचे भरघोस असे सहकार्य लाभले. तसेच शाळेचे मुख्याध्यापक कवडे, शिक्षिका गमे, धोत्रे, शिक्षक चौगुले, कोळी यांनी कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीजा नाईकनवरे यांनी केले. कार्यक्रमाचा सांगता वंदे मातरम घेऊन करण्यात आली

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!