सोलापूर जिल्हा

माळशिरस तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ.

टीम विजयदिप न्यूज.

माळशिरस तालुक्‍यात आज शनिवारी दि.०३ एप्रिल रोजी कोरोनाचे नवे ५८ रुग्ण आढळून आल्याने तालुक्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चाललेली आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी कोरोना रुग्णांबाबत माहिती दिली आहे. यामध्ये माळशिरस तालुक्यात आज नवीन ५८ रुग्ण आढळून आले आहेत.

माळशिरस तालुक्यात गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये कोविड-१९ केसेस मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. आजच्या अहवालानुसार एकूण ५८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. गेले एक वर्षभर आपण कोविड-१९ या आजाराशी दोन हात करत आहोत. आपण एकदम सुरुवातीची परिस्थिती पाहिली तर मोठी बाजारपेठे असलेली, जास्त लोकसंख्या असलेली गावे, तसेच शहराची संपर्क असलेली गावे येथे रुग्णाचे प्रमाण जास्त आढळत होते. आताची परिस्थिती पाहिली तरीही तसाच कल दिसत आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये या गावाबरोबरच इतरत्रही काळजी घेणे फार गरजेचे आहे. ज्या गावात केसेस नाही त्यांनी आपल्या गावात हे इन्फेक्शन कसे येणार नाही यासाठी प्रयत्न पर करणे फार गरजेचे आहे. गेल्या वर्षीची परिस्थिती पाहता आत्ताच्या परिस्थितीमध्ये एक बदल दिसत आहे की आता कुटुंबेच्या कुटुंबे पॉझिटिव्ह येत आहेत.

डॉ.रामचंद्र मोहिते,

तालुका आरोग्य अधिकारी,

पंचायत समिती, माळशिरस.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!