अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारीपदी बसवराज शिवपुजे.

टीम विजयदिप न्यूज.
अकलूज उपविभागीय पोलिस अधिकारी पदी ठाणे मुरबाड ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी बसवराज शिवपुजे यांची नियुक्ती झाली असून अकलूजचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू यांची जालना उपविभागीय पोलिस अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक / पोलीस उप आयुक्त तसेच उप अधीक्षक / सहायक पोलीस आयुक्त (नि:शस्त्र) या संवर्गातील अधिकार्यांच्या बदल्या झाल्या असून याबाबत शासनाच्या गृह विभागाने शासन आदेश आज ९ सप्टेंबर रोजी पारित केला आहे.
निरज राजगुरू यांनी आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले होते.
तसेच सोलापूर ग्रामीणचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांची रायगड या ठिकाणी अपर पोलिस अधीक्षक म्हणून बदली झाली असून त्यांच्या ठिकाणी लातूरचे अपर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांची नियुक्ती झाली आहे.



