इतर

श्रीपुर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुखदेव साठे तर सचिवपदी विजयकुमार देशमुख यांची निवड.

टिम: विजयदिप न्यूज.

श्रीपुर (ता.माळशिरस) येथील श्रीपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुखदेव साठे तर सचिवपदी विजयकुमार देशमुख यांची एकमताने  निवड करण्यात आली. यावेळी  प्रकाश केसकर, बी.टी. शिवशरण, राजु मुलाणी, महादेव जाधव, संदीप लोणकर, विनायक बागडे आदि पत्रकार उपस्थित होते. 

महादेव जाधव यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्याने नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यावेळी नूतन अध्यक्ष सुखदेव साठे यांचा सत्कार महादेव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला तर नूतन सचिव विजयकुमार देशमुख यांचा सत्कार बी. टी. शिवशरण यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी प्रास्ताविक मावळते अध्यक्ष महादेव जाधव यांनी करून पत्रकार संघाच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला तसेच यावेळी पत्रकार संघाच्या सदस्यांनी विचार मांडले.

श्रीपुर पत्रकार संघाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून या संघाच्या माध्यमातून सर्वाना विश्वासात घेऊन पत्रकारांच्या समस्या सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहील असा विश्वास नूतन अध्यक्ष सुखदेव साठे यांनी व्यक्त केला.

पत्रकारितेमध्ये काम करीत असताना साठे व देशमुख यांनी अनेक सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, क्रीडा, शोध पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रांमध्ये लिखाण केले आहे. पत्रकार संघाचे नूतन सचिव देशमुख यांनी अनेक सामाजिक कार्यात सहभाग नोंदवला आहे.

श्रीपुर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुखदेव साठे व सचिवपदी विजयकुमार देशमुख यांची निवड झालेबद्दल त्यांचे पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, तसेच महाळूंग-श्रीपूर मधील ग्रामस्थांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!