महाराष्ट्र
पंढरपूरच्या नव्या पेठेत जमीन खचली.

विजयदिप न्यूज.
पंढरपूर शहरातील नव्या पेठेत झेंडा चौकात आज बुधवार दि.२८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या दरम्यान अचानक जमीन खचली असुन साधारणपणे ७ ते ८ फुट रुंद व सुमारे १० फुट खोल खड्डा पडला आहे.
वर्दळीच्या ठिकाणी बाजार पेठेत ही घटना घडली असली तरी सुदैवाने कोणतीही दुर्घटना मात्र घडली नाही. गांडूळे यांच्या चुरमुरे दुकाना समोर अचानक जमीन खचुन खड्डा पडल्यानंतर पाणी वर आले. जमीन अचानक खचल्याने बाजारातपेठेत एकच खळबळ उडाली आणी बघ्याची गर्दी उसळली.
नगरपालिकेत ही घटना समजताच मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर, नगर अभियंता पवार दाखल झाले. त्यांनी लगेच ब्रेकेट्स उभा करून खड्डा बुजवून घेण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी जुन्या काळात मोठा नाला असावा आणि यंदा अतिवृष्टी झाल्याने त्या ठिकाणची जमीन खचली असावी अशी शक्यता मुख्याधिकारी मानोरकर यांनी व्यक्त केली.