‘पांडुरंग सहकारी’च्या ५,५५,५५५ व्या साखर पोत्याचे पूजन.

कामगारांना १२ टक्के वेतनवाढ अदा.
टिम: विजयदिप न्यूज.
श्री पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये उत्पादित झालेल्या ५,५५,५५५ व्या साखर पोत्याचे पूजन कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांचे शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी व्हा.चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी आदि उपस्थीत होते.

यावेळी कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक यांनी माहिती दिली की, कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ हा २३ ऑक्टोंबर रोजी सुरु झाला असून कारखान्याने ८४ दिवसात ५,३२,३९० मे.टन ऊसाचे गाळप करुन ५,५५,९५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्याच बरोबर कारखान्याचा साखर उताराही ११.०३ टक्के राहिला आहे. पांडुरंग सहकारी हा नेहमीच सभासद शेतकऱ्यांचे, कामगारांचे हित जोपासत आला आहे. स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसारच कारखान्याचे कामकाज सुरु असून यानंतर त्याचप्रमाणे पुढेही अखंडीतपणे सुरु राहील अशी ग्वाही दिली. कारखान्याने गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये प्रतिदिन सरासरी ७००० मे.टनाने गाळप चालत असून त्यामध्ये सातत्य राखले आहे. त्याचबरोबर साखर कारखान्याचा साखर उताराही चांगला आहे.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार संघटना यांनी साखर कामगारांना दिलेली १२ टक्के वेतनवाढ कारखाना व्यवस्थापनाने नोव्हेंबरच्या पगारामध्येच अदा केली असून कामगारांमध्ये ऊत्साहाचे वातावरण आहे.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी यांनी माहिती दिली की, कारखान्याचे गाळप यावर्षी उच्चांकी होणार असून गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये माहे एप्रिल २०२२ मध्ये ऊस तोडी घेणाऱ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति मे.टन रु.१००/- प्रमाणे एफ.आर.पी. व्यतीरिक्त आगाऊ रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे एप्रिल २०२२ मध्ये गाळपास येणाऱ्या ऊसास प्रती मे. टन रूपये २७००/- प्रमाणे ऊस दर दिला जाणार आहे. जास्तीत जास्त ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांचा ऊस एप्रिलमध्ये गाळप करण्यासाठी राखून ठेवावा असे आवाहन केले.
यावेळी कारखान्याचे संचालक दिनकरराव मोरे, दिलीप चव्हाण, हरीष गायकवाड, उमेशराव परिचारक, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासो यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हणमंत कदम, किसन सरवदे, संगिता साळुंखे, सुशिलाबाई पाटील, कारखान्याचे वर्क्स मॅनेजर आर.बी.पाटील, प्रोडाक्शन मॅनेजर एम.आर. कुलकर्णी, केन मॅनेजर एस.सी.कुमठेकर, चिफ अकौंटंट आर.एम.काकडे, डिस्टीलरी मॅनेजर एस.ई.शेख, को.जन मॅनेजर सचिन विभुते, सिव्हील इंजिनिअर एच.एस.नागणे, मटेरियल मॅनेजर एम.जी.देशपांडे, संगणक प्रमुख तानाजी भोसले, ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, सहा.अधिक्षक बी.एस.बाबर आदि उपस्थित होते.