माळशिरस तालुका

ज्येष्ठ पत्रकार प्रसाद जोगळेकर यांचे निधन.

टीम विजयदिप न्यूज.

अकलुज येथील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक प्रसाद जोगळेकर यांचे हृदयविकाराच्या आजाराने निधन झाले. ते ६० वर्षाचे होते .

साप्ताहिक गावकुसच्या माध्यमातून त्यांनी आपल्या पत्रकारीतेला सुरुवात केली होती. राज्यातील विविध दैनिकाचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिले. सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्याची वरदायिनी असलेल्या उजनी पाणी प्रश्नावर त्यांनी आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजता एक व्हिडिओ वार्तापत्र बनविले. त्यानंतर मित्रांशी गप्पा मारत असतानाच सायंकाळी ५ .२५ वाजता त्यांना अचानक चक्कर आली व ते कोसळले. मित्रांनी त्यांना ताबडतोब अकलूज येथील कार्यालयातून डॉ.देवडीकर यांच्या रुग्णालयात नेले परंतु तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. माळशिरस तालुक्याने एक हरहुन्नरी पत्रकार गमावला असल्याची खंत अनेक मान्यवरांनी व्यक्त केली.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!