माळशिरस तालुका

‘महिला शिक्षिकां’ची खंडाळी शाळा तालुक्यात व्दितीय.

टीम: विजयदिप न्यूज.

स्वच्छ शाळा सुंदर शाळा उपक्रमांमध्ये माळशिरस तालुक्यातून इयत्ता पहिली ते चौथी पाचवी बहु शिक्षकी शाळांच्या प्राथमिक गटातून जिल्हा परिषदेच्या खंडाळी शाळेने व्दितीय क्रमांक पटकाविला. तालुक्याचे गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख यांनी तालुकास्तरीय स्पर्धेचा निकाल नुकताच घोषित केला. सर्वच्या सर्व चार महिला शिक्षक असलेल्या खंडाळी शाळेचा अंतर बाह्य कायापालट करण्यात मोठे यश संपादन केले आहे.

शाळाबाह्य मुलांचा शोध घेत बालरक्षक मोहीम प्रभावीपणे वापरली. परिणामी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शाळेने ९१ पटावरून १४२ पदापर्यंत मजल मारून जिल्हा परिषदेच्या शाळेत तब्बल ६६ टक्के च्या वाढीसह ५१ विद्यार्थ्यांची वाढीव पटनोंदणी केली आहे.

सारिका महाजन, छाया पोळ, शीतल बिराजदार, कविता हिंगमिरे यांच्या महिलांच्या एकत्रित टीमने हातात ब्रश घेऊन शाळेच्या रंगविलेल्या भिंती, फुलझाडांनी आणि औषधी वनस्पती ने भरलेली परसबाग खत निर्मिती तेलाच्या डब्यावर पेंट केलेले संदेश शाळेची बाह्य शोभा वाढवत आहेत. गृह भेटीद्वारे अध्यापन, ऑनलाइन विविध स्पर्धा, झूम व गुगलमीट द्वारे अध्यापन, शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, स्वतःचे युट्युब टीव्ही संगणक प्रोजेक्टरचा ऑनलाईन अध्यापन साठी पुरेपूर वापर करून कोरोना काळात अखंडितपणे शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.

याकामी खंडाळीचे सरपंच बाबुराव पताळे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदा चव्हाण तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रणजित कदम खंडाळी ग्रामस्थ पालक वर्ग यांनीही सुमारे पंचवीस हजार रुपयांच्या लोकसहभागातून शैक्षणिक उठावात मदत केली. अशी माहिती मुख्याध्यापिका सारिका महाजन यांनी दिली. शाळेच्या उज्वल यशाबद्दल गटविकास अधिकारी श्रीकांत खरात, गटशिक्षणाधिकारी धनंजय देशमुख, शिक्षण विस्ताराधिकारी महालिंग नकाते, केंद्रप्रमुख आनंद कचरे यांनी अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!