स्व.आ.हनुमंतराव डोळस यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी साजरी.

राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे सरचिटणीस संकल्प डोळस यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन.
टिम: विजयदिप न्यूज.
माळशिरस तालुक्याचे माजी आमदार संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष स्व.हनुमंतराव डोळस याचे तृतीय पुण्यस्मरण दसुर (ता.माळशिरस) या त्यांच्या गावी संपन्न झाले. पुण्यस्मरणानिमित्त स्व.आ.हनुमंतराव डोळस यांचे सुपुत्र राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे सरचिटणीस संकल्प डोळस, स्व.आ.हनुमंतराव डोळस यांच्या अर्धागींनी श्रीमती कांचन डोळस, कन्या कु.सिद्धि डोळस यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुण्यस्मरणानिमित्त ह.भ.प धनंजय गुरव महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला होता. कीर्तन सोहळ्यानंतर स्व.आ.हनुमंतराव डोळस यांच्या प्रतिमेवरती पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच संकल्प डोळस याच्या हस्ते आरती घेण्यात आली व त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी वारकरी संप्रदायातील लोक तसेच स्व.आ.हनुमंतराव डोळस याच्यावरती प्रेम करणारे माळशिरस तालुक्यातील असंख्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्व.आ. हनुमंतराव डोळस हे २००९ साली पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेवरती गेले, त्यानंतर २०१४ ला ते दुसर्यांदा आमदार झाले परंतु २०१४ सालचा विधानसभा सदस्यत्वाचा कार्यकाल शिल्लक असतानाच त्यांचे दुख:द निधन झाले. स्व.आ.डोळस यांनी लहानपणापासूनच अत्यंत खडतर परस्थितीत शिक्षण पार पाडत विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. त्यांनी आमदारकीच्या अगोदरच संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे (राज्यमंत्री दर्जा) अध्यक्ष म्हणून काम केले. संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी महामंडळ नावारूपाला आणले व आपल्या कामाचा वेगळाच ठसा निर्माण केला. त्यानंतर त्यांनी माळशिरस तालुक्याचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले. आपल्या आमदारकीच्या कार्यकाळात तालुक्याच्या विकासाला प्राधान्य दिले. त्याच्या कार्यकाळात तालुक्यात विविध विकासकामे खेचून आणली, संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात हायमास्ट दिवे लावून तालुका प्रकाशात उजळवून काढला, तालुक्यातील विजेच्या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी तालुक्यात विविध ठिकाणी वीज वितरण कंपनीची सब स्टेशन उभारणी केली. सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा चांगल्या पध्दतीच्या मिळाव्यात म्हणून नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र उभा केली. त्यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून सोयी सुविधा निर्माण केल्या.
पुण्यतिथी कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष मदनसिंह मोहिते-पाटील, फत्तेसिंह माने-पाटील, हिंदुराव माने-पाटील, प्रसिध्द हृदय रोग तज्ञ डॉ.एम.के इनामदार, कॉग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश(बापू) पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शंकरनाना देशमुख, कॉग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते-पाटील, राष्ट्रवादी कॉग्रेसचे रमेश पाटील, अकलूजचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील, माळशिरस चे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख, राष्ट्रवादी प्रभाकर इंगळे, उद्योजक विनोद दोशी, विजय शिंदे, नितिन इंगवले-देशमुख आदि मान्यवर उपस्थित होते.