महाराष्ट्र

स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या पुण्यस्मरणानिमित्त पांडुरंग सहकारीमध्ये रक्तदान शिबीर.

टिम विजयदिप न्यूज.

श्री.पांडुरंग सहकारी साखर कारखाना लि,श्रीपूर (ता.माळशिरस) येथे कारखान्याचे संस्थापक चेअरमन स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त रक्तदान शिबीराचे  कोवीड १९ चे सर्व नियम व अटींचे पालन करुन आयोजन केले होते. यावेळी कारखान्याच्या ४०० कामगारांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. 

कारखान्याच्या प्रशासकीय ऑफिसमध्ये शेतकरी भवन येथे कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, रोहन परिचारक यांच्या उपस्थितीत या रक्तदान शिबिरास सुरुवात झाली. रक्तदान शिबिराच्या सुरवातीला स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेस अभिवादन करणेत आले. 

यावेळी कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक, अर्बन बँकेचे व्हा.चेअरमन दिपक शेटे,  ऋृषीकेष परिचारक, इत्यादिंनी भेट दिली. स्व.सुधाकरपंत परिचारक त्यांच्या प्रती असणाऱ्या भावना प्रत्येक रक्तदाते व मान्यवरंाच्या चेहऱ्यावर दिसून येत होत्या. कारखान्यामध्ये स्व.सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमीत्त कामगारांनी रक्तदान करुन आदरांजली अर्पण केली.

स्व. सुधाकरपंत परिचारक यांचे कारखान्याच्या जडणघडणीत व पांडुरंग परिवाराच्या प्रत्येक संस्थेमध्ये असणाऱ्या योगदानामुळेच आज त्यांच्या पुण्य स्मरणनिमीत्त कारखान्याच्या उत्पादन विभाग, रसायन विभाग, जनरल विभाग, अकौंट विभाग, सिव्हील विभाग, इन्स्ट्रुमेंट विभाग, ऊस विकास विभाग, सुरक्षा विभागातील कामगारांनी त्यांचे नाव नोंदणी करुन प्रत्येक विभाग अंतर्गत येणाऱ्या रक्तदात्यांनी रक्तदान केले यासाठी रक्तपेढी म्हणून पंढरपूर येथील पंढरपूर ब्लड बँक यांनी मोठी जबाबदारी पार पाडली. 

श्री पांडुरंग परिवारास स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या आदर्शामुळे सर्व संस्था योग्य प्रकारे चालत असून यासर्व संस्था अर्थीक दृष्टया सक्षम आहेत. स्व.सुधाकरपंत परिचारक यांचा आदर्श घेवून कारखान्याचे चेअरमन आ.प्रशांतराव परिचारक, उमेशराव परिचारक यांच्या अधिपत्याखाली या सर्व संस्था सदृढ आहेत. रक्तदान शिबीर व्यवस्थीत पार पाडण्याच्या दृष्टीने कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.यशवंत कुलकर्णी, प्रोडाक्शन मॅनेजर एम.आर.कुलकर्णी, केन मॅनेजर संतोष कुमठेकर, चीफ अकौंटंट रविंद्र काकडे, सिव्हील इंजिनियर एच.एस.नागणे, ऊस विकास अधिकारी एस.पी.भालेकर, डिस्टीलरी मॅनेजर सय्यदनुर शेख, संगणक प्रमुख टी.एस.भोसले, इस्टेट मॅनेजर रमेश गाजरे,  वैद्यकिय अधिकारी एस.एस.पोफळे, प्रमोद पवार, डे.चीफ केमीस्ट, हेड टाईम किपर एस.एन.कदम एम.एल.उपासे, इस्ट्रुमेंट मॅनेजर, समीर सय्यद, इस्ट्रुमेंट मॅनेजर, डे.चीफ इंजिनियर ए.डी.बारटक्के, सहा.कार्यालय अधिक्षक बी.एस.बाबर इत्यादींनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!