महाराष्ट्र

अवैध धंद्यावर वेळापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; वर्षभराच्या कारवाईच्या तुलनेत चार महिन्यात अधिक कारवाई.

वेळापूर पोलिसांच्या कामगिरीचे जनतेमधून कौतुक.

टीम विजयदिप न्यूज.

वेळापूर (ता.माळशिरस) येथील पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वेळापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवानराव खारतोडे हे पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यावर धडक धाडसी कारवाई करत असल्यामुळे वेळापूर पोलीसांच्या धाडसी कारवाई बद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात असून पोलीस निरीक्षक भगवानराव खारतोडे यांनी त्यांच्या चार महिन्याच्या कार्यकाळात मागील २०२० वर्षाच्या तुलनेत २०२१ वर्षाच्या पहिल्या ४ महिन्यातच दुप्पट केसेस केल्या आहेत.

भगवानराव खारतोडे,पोलीस निरीक्षक

पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी अवैध वाळू उपसा करणार्‍यांच्या मुसक्या आवळल्या असून फेब्रुवारी २०२१ ते आजपर्यंत अवैध वाळू उपसा प्रकरणी ७ गुन्हे नोंद करण्यात आले असून त्यामध्ये ६ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. तर ५१ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करून १३ आरोपींवर कारवाई करण्यात झाली आहे.

अवैध दारू विक्री प्रकरणी फेब्रुवारी २०२१ ते आजपर्यंत २४ गुन्हे दाखल करण्यात आले असून ५ लाख २१ हजार ३२५ रुपयाचा दंड वसूल करण्यात आला असून २४ आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच अवैध जुगार खेळणाऱ्या लोकांवर ३ ठिकाणी छापे मारून १ लाख ८ हजार २३० रूपयाचा मुद्देमाल जप्त करून ७ आरोपींवर कारवाई केलेली आहे.

त्याचप्रमाणे मोटर व्हेइकल ॲक्ट प्रमाणे ५०६ वहान चालकांवर कारवाई करून १ लाख २६ हजार ३०० रुपयाचा दंड वसूल केला आहे. कोविड काळात विना मास्क फिरणाऱ्या २८१ वाहन चालकांवर कारवाई करून १ लाख ४० हजार ५०० रुपयाचा दंड वसूल केलेला आहे. तसेच सोशल डिस्टन्स नियम मोडणारे ४९२ लोकांवर कारवाई केलेली असून ४९ हजार २०० एवढा दंड वसूल केलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे ५४ लोकांवर कारवाई करून १० हजार ८०० रुपयाचा दंड वसूल केलेला आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे यांनी व वेळापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी अवैध धंद्यावरती केलेल्या कामगिरीमुळे पोलिसांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!