सोलापूर जिल्हा
सुक्ष्म सिंचन योजना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर.- गजानन ननावरे.


टीम विजयदिप न्यूज.
प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत सुक्ष्म सिंचन योजना सन २०१९-२० मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ई-ठिबक प्रणालीवर अर्ज केला होता. परंतु पूर्वसंमती मिळालेले नाही. अशा शेतकऱ्यांनी ३१ डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन माळशिरस तालुका कृषी अधिकारी गजानन ननावरे यांनी केले आहे.
पुढे बोलताना ननावरे म्हणाले की, ज्या शेतकऱ्यांनी सन २०१९-२० मध्ये ई-ठिबक प्रणालीवर अनुदानासाठी अर्ज केले होते. परंतु पूर्वसंमती मिळाली नाही अशा शेतकऱ्यांनी सन २०२०-२१ मध्ये महाडीबीटी पोर्टलवर https:// mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर नव्याने अर्ज करावेत असे म्हणाले.