महाराष्ट्र

रुद्रतेज माने-देशमुख वेटलिफ्टिंग राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यात दुसरा.

टिम: विजयदिप न्यूज

कराड (जि.सातारा) येथे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ (एमएसबीटीई) आणि आयईडीएसएसए यांच्यावतीने झालेल्या राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग स्पेर्धेत १०५ किलो वजनी गटातून तब्बल ११७ किलो वजन उचलून सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च मधील तृतीय वर्ष डिप्लोमा मेकॅनिकल विभाग मध्ये शिकत असलेला विद्यार्थी रुद्रतेज अमरसिंह माने-देशमुख याने महाराष्ट्र राज्यातून व्दितीय क्रमांक मिळवला आहे.

रुद्रतेज अमरसिंह माने-देशमुख हा माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथील भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष व वेळापूर सोसायटीचे चेअरमन अमरसिंह माने-देशमुख यांचा मुलगा आहे.

रुद्रतेज अमरसिंह माने-देशमुख याने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्याचे वेळापूर परिसरात कौतुक केले जात आहे. यश संपादन केल्याबद्दल त्याचे महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, सहकार महर्षी कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील, आ.रणजितसिंह मोहिते-पाटील, आ.रामभाऊ सातपुते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मदनसिंह मोहिते-पाटील, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांच्यासह अनेकांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

रुद्रतेज माने-देशमुख याला प्राचार्य फुले, बागल सर ,कांबळे सर, समाधान माने, लोंढे सर यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!