माढा मतदारसंघातील माळशिरस तालुक्यातील विविध रस्ते कामांचे भूमिपूजन.

टीम विजयदिप न्यूज.
आ.बबनराव शिंदे यांच्या प्रयत्नामधून माढा विधानसभा मतदारसंघात राज्य शासनाच्या विविध योजनेमधून मंजूर झालेल्या विविध रस्ते कामांचा भूमिपूजन समारंभ सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री, तथा राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग मा.दत्तात्रय भरणे यांच्या शुभहस्ते, माढा विधानसभा मतदार संघाचे आ.बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अनेक मान्यवरांच्या उपस्थीत शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे.

या होणार्या भूमिपूजन कार्यक्रमात माळशिरस तालुक्यामधील खळवे-जांबुड-नेवरे रस्ता जांबुड गावाजवळ पुल बांधणे या कामासाठी २ कोटी, नेवरे-उंबरे(वे)-करकंब रस्ता(भाग उंबरे (वे) ते कोंढारपट्टा) या कामासाठी १ कोटी २० लाख, वाघोली ते लवंग रस्ता या कामासाठी २ कोटी रुपये, माळेवाडी ते बोरगाव रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीसाठी ३० लाख रुपये, माळखांबी ते नेवरे रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीसाठी २५ लाख, तसेच वाफेगाव ते वाघोली रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीसाठी ८५ लाख रुपये अशाप्रकारे निधि खर्चला जाणार असून या विविध रस्ते कामांचा भूमिपूजन समारंभ शुक्रवार १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.०० वाजता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम, राज्यमंत्री मा.दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व माढा विधानसभा आ.बबनराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच अनेक मान्यवरांच्या संपन्न होणार आहे.
भूमिपूजनाचा कार्यक्रम जांबुड, कोंडारपट्टा,वाघोली,बोरगांव, नेवरे, वाफेगाव या ठिकाणी रस्ते आणि पुलाच्या कामांचे भूमिपूजन संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला अनेक मान्यवर राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत.